Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय क्रिकेट संघाचा मोठा चाहता आहे 'वॉल्व्हरिन', हा खेळाडू आहे आवडता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:39 IST

आगामी 'डेडपूल व्हर्सेस वॉल्व्हरिन' सिनेमातील ह्यू जॅकमॅनने भारतीय क्रिकेट संघातील त्याचा आवडता खेळाडू कोणता आहे, हे सांगितलं आहे (hugh jackman, t20 wc)

सध्या 'डेडपूल व्हर्सेस वॉल्व्हरिन' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. मार्व्हल्स आणि 'डेडपूल - वॉल्व्हरिन' फ्रँचायझीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. थोड्याच दिवसांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाची टीम काही दिवसांपूर्वी प्रमोशनसाठी भारतात आली होती. त्यावेळी एका मुलाखतीत प्रश्न विचारले असता वॉल्व्हरिनची भूमिका साकारणारा अभिनेता ह्यू जॅकमॅनने त्याचा आवडता खेळाडू कोण हे सुद्धा सांगितलंय.

हा आहे ह्यू जॅकमॅनचा आवडता खेळाडू

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमनने भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे कौतुक केले. प्रसिद्ध अभिनेत्याने आपली क्रिकेटची आवड व्यक्त केली आणि रोहित शर्माच्या प्रतिभेचे कौतुक केले. जेव्हा 'डेडपूल अँड वॉल्व्हरिन' अभिनेत्याला टीम इंडियामध्ये तुमचा आवडता क्रिकेटर कोण आहे, असे विचारण्यात आले तेव्हा एक क्षणही न घालवता अभिनेता म्हणाला, "सध्या मला रोहित आवडतो." असं म्हणताच 'डेडपूल' फेम रायन रेनॉल्ड्सलाही आश्चर्यचकित झाला. जो मुलाखतीदरम्यान उपस्थित होता. तेव्हा ह्यू म्हणाला, "तुम्ही वर्ल्डकप जिंकला याचा मला आनंद आहे." 

ह्यू जॅकमॅनचा 'डेडपूल अँड वॉल्व्हरिन' कधी रिलीज होणार?

हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमनची संपूर्ण जगात आणि विशेषतः भारतातही खूप क्रेझ आहे. हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित 'डेडपूल अँड वॉल्व्हरिन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो रायन रेनॉल्ड्ससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ह्यू जॅकमनने अनेकवेळा पडद्यावर साकारलेली वॉल्व्हरिनची भूमिका गाजली. केविन फीगे निर्मित हा सिनेमा २६ जुलै रोजी देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे.

टॅग्स :भारतभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024