Join us
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत इतक्या बदलल्या ‘दंगल गर्ल्स’, एकीने तर अ‍ॅक्टिंगला ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 12:03 IST

‘दंगल’ या सिनेमात आमिर खान याच्यासह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा,जायरा वसीम मुख्य व सुहानी भटनागर भूमिकेत होत्या.  

‘दंगल’ या सिनेमाला काल 23 डिसेंबरला 3 वर्षे पूर्ण झालीत. हरियाणाच्या रेसलर गीता आणि बबीता फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात आमिर खान याच्यासह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा,जायरा वसीम मुख्य व सुहानी भटनागर भूमिकेत होत्या.  

तीन वर्षांनंतर सान्या, सना, जायरा प्रचंड बदल झाला आहे. यापैकी जायरा अ‍ॅक्टिंगला रामराम ठोकत धर्माच्या मार्गावर निघाली आहे तर सान्या व सना आजही बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. दोघींनीही या तीन वर्षांत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जायरा वसीमने या सिनेमात गीता फोगाटच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. यानंतर ‘सीक्रेट सुपरस्टार’ या सिनेमात जायरा दिसली. पुढे प्रियंका चोप्रा व फरहान अख्तर या दिग्गजांसोबत ‘स्काय इज पिंक’ या सिनेमात तिला संधी मिळाली. पण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच जायराने अ‍ॅक्टिंग सोडण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी...’ असे म्हणत तिने बॉलिवूड सोडले.

सुहानी भटनागरने ‘दंगल’मध्ये बबीता फोगाटच्या बालपणीची भूमिका साकारली होती. अनेक जाहिरातीत झळकलेली सुहानी सध्या   आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतेय. 

फातिमा सना शेख हिने या सिनेमात गीता फोगाटची भूमिका साकारली होती. या भूमिकेने फातिमाला एक वेगळी ओळख दिली. यानंतर ती आमिर खानसोबत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये झळकली. सध्या ती अनुराग बासूच्या एका सिनेमात बिझी आहे. याशिवय सैफ अली खानसोबत ‘भूत पुलिस’ या सिनेमात झळकणार आहे.

 

सान्या मल्होत्राने या सिनेमात बबीता फोगाटची भूमिका साकारली होती. यानंतर ‘पटाखा’ या चित्रपटात झळकली. सुपरडुपर हिट ठरलेल्या ‘बधाई हो’ या सिनेमातही ती झळकली. लवकरच ती ‘शकुंतला देवी’ या सिनेमात दिसणार आहे.

 

टॅग्स :आमिर खानसान्या मल्होत्राझायरा वसीमफातिमा सना शेख