Join us

गौतमी पाटीलने 'चंद्रा' गाण्यावर केला भन्नाट डान्स; विशाल निकमने मारली शिट्टी तर सिद्धार्थ जाधव थिरकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:47 IST

गौतमी पाटीलने स्टार प्रवाहच्या आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी मराठी कलाकारांनी तिच्या परफॉर्मन्सला चांगलीच दाद दिली

गौतमी पाटील ही महाराष्ट्राची सर्वांची आवडती नृत्यांगना म्हणून ओळखली जाते. गौतमीच्या डान्सचे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कार्यक्रम होतात. गौतमी पाटीलने अलीकडच्या काळात अनेक मराठी सिनेमांमध्येही खास डान्स केला. पण आता गौतमी पाटील पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर झळकणार आहे. स्टार प्रवाहवरील 'आता होऊ दे धिंगाणा ३'मध्ये गौतमी पाटील हजेरी लावणार आहे. यावेळी गौतमीच्या नृत्याला कलाकारांनी चांगलीच दाद दिलेली दिसली.

गौतमी पाटीलच्या नृत्याचा धिंगाणा

स्टार प्रवाहवरील 'आता होऊ दे धिंगाणा ३'मध्ये गौतमी पाटील उपस्थिती दर्शवणार आहे. यावेळी गौतमीने अमृता खानविलकरच्या गाजलेल्या 'चंद्रा' गाण्यावर खास डान्स केला. याशिवाय 'सबसे कातील गौतमी पाटील' या गाण्यावर गौतमीची खास अदाकारी दिसली. गौतमीचं नृत्य पाहून स्टार प्रवाहच्या कलाकारांनी चांगलीच दाद दिली. व्हिडीओत पाहायला मिळेल की, सिद्धार्थ जाधव थिरकला. याशिवाय विशाल निकमने खास शिट्टी मारुन गौतमीच्या नृत्याची वाहवा केली.

गौतमी पाटीलची चर्चा

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच गौतमी पाटील एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. फक्त दिसणार नाही गौतमीचं खास नृत्यही सर्वांना पाहायला मिळणार आहे. गौतमीने गेल्या काही महिन्यांमध्ये 'लाइक आणि सबस्क्राइब', 'मूषक आख्यान', 'महाराष्ट्र फाइल्स' अशा मराठी सिनेमांमध्ये खास नृत्य केलंय. गौतमीचा सहभाग असलेला 'आता होऊ दे धिंगाणा ३'चा विशेष भाग या शनिवारी-रविवारी अर्थात २८-२९ डिसेंबर रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळेल.

टॅग्स :गौतमी पाटीलस्टार प्रवाहसिद्धार्थ जाधव