Join us
Daily Top 2Weekly Top 5

दलेर मेहंदी यांचे 'चिंतामणी गणेश' गाणे झाले रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 18:36 IST

सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळत आहे. सर्वजण बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत.

सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळत आहे. सर्वजण बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. त्यात आता इंडी पॉप गायक दलेर मेहंदी यांचे गणेशोत्सवासाठी नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या गाण्याचे नाव आहे चिंतामणी गणेश. हे गाणे दलेर मेहंदी यांच्या लेखणीतून साकार झाले आहे आणि त्यांनीच संगीतबद्ध केले आहे. हे गाणे बाप्पा आलेले संकट दूर करेल, असा विश्वास देतो.

चिंतामणी गणेश या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या गाण्याच्या सुरूवातीला त्याची आणि इतर गणेशभक्त पहायला मिळत आहेत, जे उत्साहाने बाप्पाची पूजा करताना दिसत आहेत. आता हे गाणे डी रिकॉर्ड्सने प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे.

या गाण्याबद्दल दलेर मेहंदी म्हणाले की, मित्रांनो, आनंद वाटल्यामुळे आनंद आणखी वाढला जोता. मी खूप आनंद तुमच्यासाठी आणि जवळच्यांना वाटला आहे आणि तोही श्री गणेशजीच्या चरणाकडे. बाप्पाच्या चरणापाशी सर्वांची हजेरी लागली आहे. सर्वांनी बाप्पाकडे प्रार्थना केली आहे की बाप्पा सर्वांचे घर आनंदाने भर, दुःख आणि आजारपण दूर कर. मोठे आणि लहान सर्वजण हे गाणे ऐका. हे गाणे सर्वांना ऊर्जा देईल.

दलेर मेहंदी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहेत आणि ते वेगवेगळ्या शैलीत गाणे सादर करण्याचा प्रयत्न करत असतात. ऑगस्ट महिन्यात त्यांना एक गजल, 'सड़ा दिल तोड़के', फिर एक शिव ट्रैक 'भोले नाथ भंडारी', एक राजस्थानी लोक "आओ जी"सोबत राग देस, सरस्वती आणि जयजयवंतीमध्ये डेब्यू करताना पाहिले होते. त्यांचे काही गाणी प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

टॅग्स :दलेर मेहंदीगणेशोत्सव