Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दलदल' वेबसीरिजचा अंगावर काटा आणणारा टीझर; भूमी पेडणेकर आणि चिन्मय मांडलेकरची प्रमुख भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:11 IST

'दलदल' वेबसीरिजचा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज. भूमी पेडणेकरसोबत मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरची जुगलबंदी दिसणार आहे

भारताचे सर्वाधिक पसंतीचे एंटरटेनमेंट डेस्टिनेशन असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी हिंदी क्राइम थ्रिलर सीरिज ‘दलदल’चा एक जबरदस्त आणि अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित केला आहे. विष धमिजा यांच्या बेस्टसेलिंग कादंबरी ‘भेंडी बाजार’वर आधारित ही सीरिज असणार आहे. या सीरिजमध्ये भूमी पेडणेकर सोबत मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर प्रमुख भूमिकेत आहे.

ही सीरिज सुरेश त्रिवेणी यांनी वेब सीरिजसाठी रूपांतरित केली असून, विक्रम मल्होत्रा आणि सुरेश त्रिवेणी यांनी तिची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांचे आहे, तर कथालेखनात सुरेश त्रिवेणी यांच्यासोबत श्रीकांत अग्निस्वरन, रोहन डिसूजा, प्रिया सग्गी आणि हुसेन हैदरी यांचा सहभाग आहे.

मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका मुंबई क्राइम ब्रँचच्या नव्याने नियुक्त झालेल्या डीसीपी रीटा फरेरा यांच्या भोवती फिरते. ही भूमिका भूमी पेडणेकर साकारत आहे. एका निर्दयी आणि क्रूर खुनीशी सामना करताना, जीव धोक्यात घालणाऱ्या या खेळात रीटा स्वतःला अडकलेली पाहते. भूमीसोबत समारा तिजोरी आणि आदित्य रावल हेही प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘दलदल’चा प्रीमियर ३० जानेवारी प्राइम व्हिडिओवर होणार आहे.

कथेबद्दल सांगायचं तर, ‘दलदल’ची कथा डीसीपी रीटा फरेरा हिच्या आयुष्याभोवती फिरते. न्यायासाठी कटिबद्ध असलेली पोलिस अधिकारी रिटाला आपल्या भूतकाळातील चुक आणि भीती सतावत असतात. त्याचदरम्यान तिच्यासमोर एका थंड डोक्याच्या गुन्हेगाराला पकडण्याचं मिशन येतं. त्यामुळे गुन्हेगारीच्या गाळात रिटा जास्त गुंतत जाते. टीझर अंगावर काटा आणणारा असून सर्वांना ३० जानेवारीपर्यंत ही सीरिज पाहण्याची वाट पाहावी लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chilling Teaser for 'Daladal' Series: Bhumi Pednekar in Lead

Web Summary : Prime Video unveils the gripping teaser for 'Daladal,' a crime thriller based on 'Bhendi Bazaar.' Bhumi Pednekar stars as DCP Rita Ferreira, hunting a ruthless killer in Mumbai. Premieres January 30.
टॅग्स :भूमी पेडणेकर चिन्मय मांडलेकरसंदीप कुलकर्णीबॉलिवूडवेबसीरिज