Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डॅडी' उर्फ अरूण गवळी दिसले नातीला खेळवताना, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 18:55 IST

अक्षय आणि योगिता यांच्या घरी मुलीच्या येण्यानं आनंद द्विगुणित झाला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता अक्षय वाघमारे नुकताच बाबा झाला आहे. अक्षयची पत्नी योगिता गवळीने गेल्या महिन्यात कन्यारत्नला जन्म दिला आहे.  योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळीची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोत अक्षय आणि योगिता यांची चिमुरडी आजोबांसोबत म्हणजेच अरुण गवळीसोबत खेळताना दिसते आहे.

अरुण गवळीची लेक योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी विवाह केला होता. त्यानंतर वर्षानंतर त्यांच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. नुकतेच त्यांनी बाळाचा बारसादेखील केला. योगिता आणि अक्षय यांनी तिचे नाव 'अर्णा' ठेवले आहे. अक्षयने सोशल मीडियावर तिच्या बारशाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

बाबा झाल्यावर अक्षय वाघमारे खूप आनंदी होता. याबाबत तो म्हणाला, 'मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरू करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.

अक्षय व योगिता दोघे लग्नाआधी ५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान कुटुंबीयांनी दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 

अक्षयने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप या मराठी चित्रपटांत काम केले आहे. ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमात अक्षयने सरदार कोयाजी नाईक बांदल यांची भूमिका साकारली होती. योगिता सामाजिक संस्थेसाठी काम करते. या माध्यामातून महिलांच्या आरोग्यासाठी ती काम करते.

 

टॅग्स :अरुण गवळी