Join us

को-स्टारने चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श! टीना दत्ताला सेटवर कोसळले रडू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 16:29 IST

‘डायन’ या मालिकेत लीड रोल साकारत असलेली अभिनेत्री टीना दत्ता हिने तिचा को-स्टार मोहित मल्होत्रावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्दे२०१० मध्ये कलर्स टीव्हीवर ‘उतरन’ या मालिकेतील टीनाच्या इच्छा वीरसिंग बुंदेला या भूमकेसाठी प्रोड्यूसर गिल्डतर्फे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्या

‘डायन’ या मालिकेत लीड रोल साकारत असलेली अभिनेत्री टीना दत्ता हिने तिचा को-स्टार मोहित मल्होत्रावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. ‘उतरन’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली टीना ‘डायन’च्या सेटवर रडताना दिसली आणि या घटनेचा खुलासा झाला.मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेतील एका इंटिमेट सीनदरम्यान मोहितने टीनाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले. मोहितला शूटींगदरम्यान अनेकदा वॉर्निंग देण्यात आली. पण मोहित थांबला नाही. अखेर टीना सेटवर रडू लागली. ‘पिंकविला’शी बोलताना टीनाने मोहितवर थेट आरोप केला नाही. पण जे काही घडले, त्याबद्दल मी प्रॉडक्शन टीमला सांगितले असल्याचे तिने सांगितले. शूट करताना मोहितशी संबंधित अनेक अडचणी आल्यात. मी बालाजी प्रॉडक्शनसोबत अनेक वर्षे काम केलेय. त्यांना मी सर्व प्रकार सांगितला. आता प्रॉडक्शन टीमकडे मी हे प्रकरण सोपवले आहे, असे टीनाने सांगितले.सूत्रांचे मानाल तर इंटिमेट सीन्स देताना अनेकदा त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटते. अनेकदा बजावूनही तो आपली सवय सोडत नाही. याच कारणामुळे टीनाला अनेकदा अडचणी आल्यात. 

दरम्यान मोहितला याबाबत छेडले असता, टीना व माझ्यात कुठलाही इंटिमेट सीन शूट झालेला नाही. त्यामुळे सगळे आरोप निराधार आहेत. टीना माझी चांगली मैत्रिण आहे, असे त्याने सांगितले.

२०१० मध्ये कलर्स टीव्हीवर ‘उतरन’ या मालिकेतील टीनाच्या इच्छा वीरसिंग बुंदेला या भूमकेसाठी प्रोड्यूसर गिल्डतर्फे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याआधी २००५ मध्ये आलेल्या ‘परिणिता’ या चित्रपटात तिने विद्या बालनच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.  रितूपर्णो घोष यांच्या ‘चोखेर बाली’या चित्रपटातही  तिने १६ वर्षीय ऐश्वर्याची भूमिका साकारली होती.  

टॅग्स :टिना दत्ता