Join us

ही टेलिव्हिजन अभिनेत्री गिल सोबत दिसली अन् सुरु झाली दोघांच्यात 'प्रेमाचा खेळ' रंगल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:51 IST

टीव्ही इंडस्ट्रीतील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री शुबमन गिलला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. कोण आहे ती

काल भारताने चॅम्पियनशीप टूर्नामेंट जिंकली. जगभरातील भारतीयांनी ही स्पर्धा जिंकल्याने जल्लोष केला. ही स्पर्धा विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल या क्रिकेटपटूंनी गाजवली. यापैकी शुबमन गिलने  (shubman gill) चॅम्पियनशीप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बांग्लादेशसोबत खेळताना शतक झळकावलं. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये गिलच्या परफॉर्मन्सची चर्चा रंगलीच. याशिवाय चॅम्पियनशीप झाल्यानंतर गीलच्या अफेअरची चर्चाही जोरात आहे. शुबमन गिल टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.शुबमन गिल या अभिनेत्रीला करतोय डेटशुबमग गिलचं याआधी सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरशी नाव जोडलं गेलं होतं. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेत्री सारा अली खानला शुबमन डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ही दोन्ही नावं आता बाजूला पडली कारण शुबमन आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरला डेट करत असल्याचा खुलासा झाला आहे.  शुबमन आणि अवनीत यांचे ऑन फील्ड आणि ऑफ फील्ड एकत्र फोटोही व्हायरल झाले आहेत.चॅम्पियनशीप स्पर्धेदरम्यान अवनीत अनेकदा दुबईतील स्टेडियममध्ये भारतीय संघाला चिअर करताना दिसून आली. याशिवाय एका फोटोत अवनीत कौरच्या मित्रांसोबत शुबमनने फोटो काढलेला दिसतोय. त्यामुळे एकूणच अवनीत आणि शुबमनचं नातं मैत्रीपलीकडे गेलं असून दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. काल इंडिया जिंकल्यावरही अवनीतने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला. अजून अवनीत किंवा शुबमन दोघांपैकी कोणीही रिलेशनशीपचा अधिकृत खुलासा केला नाहीये. त्यामुळे चर्चा खऱ्या आहेत की अफवा ही थोड्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल. 

टॅग्स :अवनीत कौरटेलिव्हिजनगुन्हेगारीभारतीय क्रिकेट संघचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५