Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहेना कुमारीची दुसरी कोरोना टेस्टही आली पॉझिटीव्ह,व्हिडीओद्वारे अनुभव शेअर करताना अश्रू झाले अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 14:30 IST

रुग्णालयात दाखल होऊन तिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना 6 दिवस झाले आहेत6 दिवसानंतरही त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झाला नाही.

काही दिवसांपासून ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतील मोहेना कुमारी रूग्णालयात उपचार घेत आहे. कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे संपूर्ण कुटुंब रूग्णालयात उपचार घेत आहे.घरात सर्वात आधी मोहेनाच्या  सासूला ताप आला होता. मात्र त्यांचा पहिला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. सर्वप्रथम सगळ्यांना हा सामान्य फ्लू असल्याचे वाटले. पण ताप वाढतच गेल्याने सासूची दुस-यांदा टेस्ट करण्यात आली त्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कुटुंबातील इतर सदस्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आणि येथे सगळ्यांची टेस्ट झाली. 

दुसऱ्यांदा चाचणी केल्यावर सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे तिने व्हिडीओत सांगितले. घरातील सदस्यांकडूनच इतरांना कोरोनाची लागण झाल्याचे तिने सांगितले. रुग्णालयात दाखल होऊन तिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना 6 दिवस झाले आहेत6 दिवसानंतरही त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झाला नाही. त्यामुळे मोहेना सध्या चिंतेत आहे. या संपूर्ण अनुभवावरून मी इतकंच लोकांना सांगू इच्छिते की मनाचे स्वास्थ जपा. ते ठीक असले की परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊ शकता.” असे सांगत तिने इतरांना कोरोनापासून सुरक्षित राहा, घाबरू नका असा ही सल्ला दिला आहे.

उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि आध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांची मोहेना सून आहे. 15 ऑक्टोबर 2019 रोजी सतपाल यांचे धाकटे पुत्र सुयश रावत यांच्याबरोबर तिचे लग्न झाले होते.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता है