Join us
Daily Top 2Weekly Top 5

अहोरात्र झटणा-या पोलिस मामांना अशोक मामांकडून मानाचं जेवण! ‘अभिनयाचा राजा’ देणार ‘फळांच्या राजा’ची ट्रीट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 14:54 IST

पोलिस बांधवांचे आभार व्यक्त करण्यासाठी अशोक सराफ व निवेदिता यांनी आखला फक्कड बेत

जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढणा-या वॉरिसर्सचे अनेकांनी आभार मानलेत. अनेकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. आता आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अशोक मामा अर्थात अशोक सराफ  आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ अहोरात्र झटणा-या या पोलिसांना एक छोटासा ‘थँक्यू’ म्हणून आमरसाचे जेवण देणार आहेत.होय, कोरोनाच्या संकटाच्या काळात  आपले पोलिस बांधव जीवाची पर्वा न करता अहोरात्र रस्त्यावर पाहारा देत आहेत. न थकता कर्तव्य बजावत आहेत. या पोलिस बांधवांचे आभार व्यक्त करण्यासाठी अशोक सराफ व निवेदिता यांनी एक फक्कड बेत आखला आहे.ओशिवारा पोलिस ठाण्यातील पोलिस बांधवांसाठी आज दुपारी साडे बारा वाजता दिवसपाळी कर्तव्यावरील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना सराफ दांम्पत्य स्वत:च्या हाताने बनवलेले आमरस व पुरीचे जेवण देणार आहे़. पोलिस बांधवांप्रती आभार व्यक्त करण्याचा यापेक्षा इतका सुंदर बेत कुठला असू शकेल.

अशोक सराफ हे विनोदाचा सम्राट म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. वयाच्या 72 व्या वर्षी सुद्धा ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अलीकडे त्यांचा ‘प्रवास’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात ते पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत दिसले होते. निवेदिता या सुद्धा मनोरंजन विश्वास तेवढ्याच अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत त्या काम करत होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे या मालिकेचे शूटींग तूर्तास ठप्प पडले आहे.

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफ