Join us

Confirmed! तापसी पन्नूने केला रिलेशनशीपबाबतचा खुलासा, या खेळाडूला करतेय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 13:08 IST

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे आली आहे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अखेर ती कोणाला डेट करतेय, याचा खुलासा झाला आहे. एका मुलाखतीत तापसीने सांगितले की, तिच्या कुटुंबाचे तिच्या बॉयफ्रेंडबद्दल काय मत आहे. तिच्या कुटुंबाला तो पसंद आहे. तापसीने सांगितले की, ती बॅडमिंटनपटू माथियास बोला डेट करते आहे.

तापसी पन्नूने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,  बॅडमिंटन प्लेयर मेथियस बो याला डेट करत आहे. तिच्या घरच्यांना देखील मेथियस आवडतो.  

ती पुढे म्हणाली की, केवळ चर्चेत राहण्यासाठी मी हे बोलत नाही कारण चाहत्यांचा विश्वास अनेक वर्षे मेहनत करुन मिळवला आहे. त्यामुळे रिलेशनशीप बद्दल मला कोणती गोष्ट लपवायची नाही.

तापसीने सांगितले की, मी फक्त आणि फक्त मेहनत आणि जिद्दीच्या बळावर जीवनाच्या या टप्प्यावर पोहोचली आहे. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या मेहनतीचे फळ आहे. इंडस्ट्रीत माझे कोणी गॉडफादर नाही. माझ्या आयुष्यात मी जे काही मिळवले आहे ते कोणाची फसवणूक करून मिळवले नाही.

तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती 'थप्पड' सिनेमात ती दिसली होती. यामधील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले.

याआधी भूमी पेडणेकरसोबत ती 'सांड की आंख' मध्ये दिसली होती. यानंतर ती 'हसीन दिलरुबा' चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :तापसी पन्नूBadminton