Join us
Daily Top 2Weekly Top 5

कन्फर्म! बायोपिकमध्ये नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार परेश रावल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 16:36 IST

गेल्या काही दिवसांपासून या सिनेमात मुख्य भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

(Image Credit: YouTube)

मुंबई : अभिनेता परेश रावल हे आपल्या एकापेक्षा एक वेगळ्या भूमिकांसाठी ओळखले जातात. आगामी संजू सिनेमातही ते सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अशातच आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

काही मीडिया रिपोर्टनुसार, परेश रावल यांनीच सांगितले आहे की, या सिनेमाची स्क्रिप्ट तयार होत आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु होईल. परेश रावल यांनी हेही सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणं  खूप चॅलेंजिंग असणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून या सिनेमात मुख्य भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर परेश रावल यांचे नाव फायनल झाले आहे. तसेच परेश रावल या सिनेमाची निर्मितीही करणार असल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलं नाहीये. 

टॅग्स :परेश रावलबॉलिवूड