Join us

भारती सिंहच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; हर्ष लिंबाचियाने पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 19:17 IST

हर्षनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती.

कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिबाचिया यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. भारतीचा पती हर्ष यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

भारतीचा पती हर्ष यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. तसंच यात 'It's A Boy' असंही लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी चर्चा करताना भारतीनं आपल्याला कन्यारत्र व्हावं अशी इच्छा व्यक्ती केली होती.  तिला मुलाखतीदरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आपल्याला मुलगी व्हावी असंच वाटत असल्याचं तिनं म्हटलं. तसंच ती आपल्याप्रमाणे मेहनती असावी आणि तुमच्यासारखं नाही जो एका मुलीला थांबवून मुलाखत घेत आहे, असं उत्तर तिनं मजेत दिलं होतं.

टॅग्स :भारती सिंगसोशल मीडियाइन्स्टाग्राम