Join us

अमृता फडणवीस आणि त्यांची लेक दिविजानं दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:38 IST

अमृता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय.

 Amruta Fadnavis : सरत्या वर्षाला गुडबाय करुन येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत अगदी आनंदात आणि उत्साहात झालं आहे. हे नवीन वर्ष अगदी भरभराटीचे, सुख-समृद्धीचे जावो असे प्रत्येकाला वाटते. यासाठी आपण शुभेच्छांचा वर्षाव देखील करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खास गोष्ट म्हणजे अमृता यांनी लाडकी लेक दिविजा फडणवीससह नववर्षाच्या सुरेल शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अमृता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. "तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत हे वर्ष आनंदाने जगा", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओमध्ये अमृता या आपल्या मुलीसोबत गाणं गाताना दिसत आहे. हे एक इंग्रजी गाणं आहे. अमृता यांनी मुलगी दिविजासोबत मॅचिंग कपडे परिधान केले होते. यावेळी दोघींमधील बॉन्डिंगही पाहायला मिळालं आहे. 

अमृता आणि दिविजा यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अमृता यांच्यासोबत दिविजा हिलादेखील गायनाची आवड असल्याचं यावेळी दिसलं. अमृता या पेशाने बँकर असून त्या गाण्याचा छंद कायम जपत आलेल्या आहेत. आजवर त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सामाजिक कार्यातही अमृता यांचा सहभाग असतो. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरीही लावताना दिसतात. अमृता या त्यांच्या वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत असतात. समाजातील घडामोडींवर त्या परखडपणे आपलं मत मांडताना दिसतात. अमृता या अनेकदा राजकीय विषयावर आणि राज्यातील राजकारणावरही अगदी बिनधास्तपणे बोलताना दिसतात. 

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीससेलिब्रिटी