Join us
Daily Top 2Weekly Top 5

Circus Trailer : 'सर्कस'चे ट्रेलर पाहून चाहते म्हणतात हा तर गोलमाल आणि ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 17:56 IST

रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग नेहमीसारखाच कॉमेडी अंदाजात दिसत आहे.

Circus Trailer : रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाचा धमाकेदार (Trailer) ट्रेलर आज प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग नेहमीसारखाच कॉमेडी अंदाजात दिसत आहे. तर सोबत जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा या एक से एक विनोदी कलाकारांची मांदियाळी आहे. ट्रेलर बघून चाहते तर खुश झालेच आहेत. 

सर्कस चे ट्रेलर आल्या आल्याच चाहत्यांनी कमेंट्स, पोस्ट चा वर्षाव केलाय. तर काहींना हो सिनेमा जुडवा २ आणि गोलमाल अगेन एकत्र केल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे ट्रेलर ला दोन्ही बाजुंनी प्रतिक्रिया येत आहेत.

रोहित शेट्टी यांनी सर्कस दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे. यामध्ये पुजा हेगडे आणि जैकलीन फर्नांडिस या दोन्ही अभिनेत्री आहेत. २३ डिसेंबर ला सर्कस सिनेमागृहात रिलीज होत आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीरणवीर सिंगसिद्धार्थ जाधवजॉनी लिव्हरजॅकलिन फर्नांडिस