Join us  

Video - CID फेम अभिनेत्रीचा कुटुंबीयांवर गंभीर आरोप; जखमांच्या खुणा दाखवत मदतीची याचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 9:57 AM

अभिनेत्री वैष्णवी धनराजचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती मदतीची याचना करताना दिसत आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वैष्णवी धनराजचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती मदतीची याचना करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या अनेक खुणा दिसत आहेत. अभिनेत्री तिला घरच्यांनी तिला मारहाण केल्याचं सांगत आहे. ती आपली व्यथा मांडते. वैष्णवी CID सारख्या अनेक मोठ्या टीव्ही शोचा भाग आहे. तिने 'तेरे इश्क में घायल' आणि 'बेपनाह' सारख्या शोमध्ये काम केलं आहे.

हिमांशू शुक्ला नावाच्या ट्विटर अकाउंटवरून वैष्णवी धनराजचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना 'सीआयडी फेम अभिनेत्री मुंबईहून मदत मागत आहे' असं लिहिले आहे. सध्या ती मुंबईतील काशिमीरा पोलीस ठाण्यात आहे. हिमांशूने अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. वैष्णवीच्या कुटुंबीयांनीही तिचा फोनही काढून घेतल्याचं या पोस्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने तिच्यासोबत झालेल्या भांडणाबद्दल सांगितलं आणि सर्वांना मदत करण्याची विनंती केली. वैष्णवीनेही तिच्या चेहऱ्यावर, ओठांवर आणि हातावर झालेल्या जखमेच्या खुणा दाखवल्या आहेत. अभिनेत्रीने सांगितलं की, तिने हा व्हिडीओ पोलीस ठाण्यातून शूट केला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर मुंबई पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी तिचा कॉन्टॅक्ट नंबर मागितला. जेणेकरून ते या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी करू शकतील.

2016 मध्ये वैष्णवी धनराजने नितीन शेरावतसोबत लग्न केलं होतं. मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत. स्पॉटबॉयला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, अभिनेत्रीने सांगितलं होतं की ती खूप घाबरली होती आणि तिला वाटत होतं की तो तिला मारून टाकेल. त्यामुळे ती घरातून पळून गेली. अभिनेत्रीने खुलासा केला होता की,  तिच्या पतीने तिला एवढी मारहाण केली होती की तिच्या पायातून रक्तस्त्राव होत होता. 

टॅग्स :सीआयडी