Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटीत अभिनेत्रीला बॉबी देओलचा आधार, सध्या राहते त्याच्याच घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 16:23 IST

चित्रांगदा सिंग बॉलिवूडमध्ये फारसी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे़ सोशल मीडियावरचा तिचा हॉट आणि ग्लॅमरस पाहिल्यानंतर ती एका मुलाची आई आहे, यावर विश्वास बसणार नाही.

घायाळ करणारं सौंदर्य, कुणाच्याही काळजाचा ठाव घेतील अशा मादक अदा आणि अभिनय यामुळे चित्रांगदा सिंग नेहमीच रसिकांचे लक्ष वेधून घेत असते. सिनेमांपेक्षा खाजगी कारणांमुळेच ती जास्त चर्चेत राहिली. चित्रांगदाने २००५ साली 'हज़ारों ख़्वाहिशें ऐसी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बॅनर्सचे सिनेमांमध्ये चित्रांगदा झळकली आहे. सिनेमा सोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून तिनेही कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. मात्र आजही मुंबईत तिचं हक्काचं घर नाही.

 

चित्रांगदा आजही भाड्याच्या घरात राहते. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही वर्षापासून ती बॉबी देओलच्या घरात भाड्याने राहत आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र इन्वेस्टमेंट म्हणून  अनेक फ्लॅटस विकत घेत पैसे गुंतवले आहेत. असे एक नाही तर अनेक फ्लॅटस त्यांच्या नावावर आहेत. काही फ्लॅटस त्यांनी मुलांच्या नावे केले आहेत.  त्यातीलच एका फ्लॅटमध्ये चित्रागंदा राहत आहे. ते घर बॉबी देओलच्या नावावर आहे.

आज ती ४४ वर्षांची आहे. पण या वयातही तिचा बोल्ड आणि हॉट अवतार चाहत्यांना घायाळ करतो. दीर्घकाळापासून चित्रांगदा बॉलिवूडमधून गायब आहे. नाही म्हणायला अलीकडे एकदोन सिनेमात ती दिसली. पण तेवढ्यापुरतीच. चित्रांगदाला बॉलिवूडमध्ये फारसे म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. याचे कारण म्हणजे, तिने घेतलेला ब्रेक. संधी मिळत असताना मी त्या नाकारल्या. याचे परिणाम मला भोगावे लागले, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. 

चित्रांगदा बॉलिवूडमध्ये फारसी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे़ सोशल मीडियावरचा तिचा हॉट आणि ग्लॅमरस पाहिल्यानंतर ती एका मुलाची आई आहे, यावर विश्वास बसणार नाही. 2001 मध्ये गोल्फर ज्योती रंधावासोबत चित्रांगदाने लग्नगाठ बांधली होती. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. कालांतराने दोघांचाही घटस्फोट झाला. असे म्हणतात की, मुलाच्या जन्मानंतर चित्रांगदाला सिनेमात परतायचे होते. पण तिच्या पतीला हे मान्य नव्हते. त्यामुळे दोघांचे वाद विकोपाला गेले. काहींच्या मते, चित्रांगदाच्या अफेअरच्या बातम्यांमुळे हे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले.

टॅग्स :बॉबी देओलचित्रांगदा सिंग