Join us

एक्स्प्रेशन्सच्या बाबतीत चिमुकल्या परीने केली अप्सरेवर मात; 'तुझा रंग लागला' वर केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:22 IST

Myra vaikul: सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर मायराचा व्हिडीओ शेअर केला असून यात मायराने कमालीचे एक्स्प्रेशन्स दिले आहेत. तिचे एक्स्प्रेशन्स पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे.

गेल्या काही काळात सोशल मीडियावर बॉलिवूडसह मराठी चित्रपटांमधील गाणीदेखील ट्रेंड होऊ लागली आहेत. यामध्ये सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (sonalee kulkarni) आगामी 'तमाशा लाइव्ह' (tamasha live) या चित्रपटातील तुझा रंग लागला हे गाणं ट्रेंड होताना दिसतंय. सोनालीने मध्यंतरी इन्स्टाग्रामवर या गाण्यावरील व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना गिरकी चॅलेंज दिलं होतं. हे चॅलेंज स्वीकारत अनेकांनी भन्नाट व्हिडीओ पोस्ट केले. विशेष म्हणजे यात चिमुकली परी म्हणजे मायरा वायकुळही (myra vaikul) मागे नाही.

'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) या मालिकेत परी ही भूमिका साकारुन मायराने विशेष लोकप्रियता मिळवली आहे. कलाविश्वात सक्रीय असलेली मायरा सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असून बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करत असते. यात नुकताच तिने गिरकी चॅलेंजचा ट्रेंड फ़ॉलो केल्याचं पाहायला मिळालं.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर मायराचा व्हिडीओ शेअर केला असून यात मायराने कमालीचे एक्स्प्रेशन्स दिले आहेत. तिचे एक्स्प्रेशन्स पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे मायराचा हा गोड व्हिडीओ शेअर करण्यापासून सोनाली स्वत:ला रोखू शकली नाही.

दरम्यान, मायरा कायम सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करत असते. अलिकडेच तिने चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

टॅग्स :सिनेमासोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी