लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाची (chhaava movie) चांगलीच चर्चा आहे. विकी कौशलने (vicky kaushal) सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. विकीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. या सिनेमाने जगभरात ६०० कोटींहून अधिकची कमाई केली. 'छावा' पाहण्यासाठी आजही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होताना दिसतेय. अशातच मेकर्सने 'छावा' सिनेमाचं तिकीट स्वस्त केलंय. 'छावा' सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्ये आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. जाणून घ्या सविस्तर'छावा' सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्येनुकतंच 'छावा' सिनेमाचे निर्माते मॅडॉक फिल्मस यांनी सोशल मीडियावर 'छावा' सिनेमाच्या खास ऑफरचा खुलासा केलाय. 'छावा' सिनेमा या शुक्रवारी म्हणजेच २१ मार्चला फक्त ९९ रुपयांमध्ये बघायला मिळणार आहे. ही ऑफर फक्त शुक्रवारपर्यंतच लागू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नजीकच्या थिएटरमध्ये 'छावा' उद्या २१ मार्चला फक्त ९९ रुपयांमध्ये बघता येईल. यामुळे 'छावा'च्या कमाईत आणखी वाढ होईल यात शंका नाही.
'छावा' सिनेमा 'या' तारखेला पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये; मेकर्सची खास ऑफर, आताच जाणून घ्या
By देवेंद्र जाधव | Updated: March 20, 2025 11:40 IST