Join us

"गौरव आता बस कर, नाहीतर तुला...", फिल्टरपाड्याच्या बच्चनवर का भडकली श्रेया बुगडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:03 IST

नव्या प्रोमोमध्ये गँगवार होताना दिसत आहे. अनेक नवे चेहरे त्यांचं टॅलेंट दाखवून परिक्षक आणि प्रेक्षकांचं मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नवीन पर्वात अनेक नवीन बदल झालेले दिसणार आहेत. 'चला हवा येऊ द्या'मध्ये कॉमेडीचं गँगवॉर रंगणार आहे. त्यासोबतच काही नवे चेहरेही दिसणार आहेत. 'चला हवा येऊ द्या'मध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम आणि फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळख मिळवलेल्या गौरव मोरेची एन्ट्री झाली आहे. या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. 

गौरव मोरेसोबत 'चला हवा येऊ द्या'मध्ये श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि प्रियदर्शन जाधव हे परीक्षक असणार आहेत. नव्या प्रोमोमध्ये गँगवार होताना दिसत आहे. अनेक नवे चेहरे त्यांचं टॅलेंट दाखवून परिक्षक आणि प्रेक्षकांचं मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण, यामध्येच परिक्षकांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. श्रेया गौरव मोरेवर भडकल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. गौरव "ए मला बोलू दे ना" असं म्हणतो. त्यावर श्रेया भडकते आणि ती म्हणते, "गौरव बस आता मी तुला त्याच बंदुकीने मारेन". आता गौरव आणि श्रेयामध्ये नेमकं काय बिनसलंय हे 'चला हवा येऊ द्या' शो सुरू झाल्यानंतरच कळेल. 

दरम्यान, 'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर करणार आहे. २६ जुलैपासून शनिवारी-रविवारी रात्री ९ वाजता हे नवं पर्व सुरू होणार आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याश्रेया बुगडेटिव्ही कलाकार