Join us

'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे ३ वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा चढले होते बोहल्यावर, त्याची पत्नी आहे खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 07:00 IST

'चला हवा येऊ द्या' शोमधून अभिनेता भारत गणेशपुरे घराघरात पोहचले.

छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' शो २०१४ सालापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक कलाकारांनी आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. या शोमधून अभिनेता भारत गणेशपुरे घराघरात पोहचले. या शोमधील कलाकार आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भारत गणेशपुरे यांच्या पत्नीबद्दल... 

भारत गणेशपुरे यांनी ३ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीसोबत गोरेगाव येथे पुन्हा लग्न एकदा लग्न केले होते. २१ वर्षांपूर्वी भारत गणेशपुरे यांचे अर्चना गणेशपुरे यांच्यासोबत लग्न झाले.

त्यांना एक मुलगादेखील आहे. त्यांनी पत्नीसोबत पुन्हा लग्न करण्यामागेदेखील एक विशेष कारण आहे.

त्याचे झाले असे की, 'चला हवा येऊ द्या'ची टीम काही वर्षांपूर्वी परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी भारत गणेशपुरे यांना सौम्य अटॅक आला होता.

भारत यांचा ज्योतिषशास्त्रावर फार विश्वास आहे. त्यांनी तातडीने ज्योतिषाकडे हात दाखवला. तर त्यांच्या गुरुजींनी त्यांना पुन्हा एकदा लग्न करण्याचा सल्ला दिला होते.त्यामुळे भारत यांनी वेळ न दवडता ज्योतिषाचे म्हणणे ऐकले आणि पुन्हा लग्नाचा निर्णय घेतला होता.

लग्नासाठी ९ मेचा मुहूर्तही निश्चित केला होता आणि ठरल्यानुसार दोघे पुन्हा एकदा बोहल्यावर चढले होते. ठरल्याप्रमाणे सर्व लग्नविधी पार पडला होता. इतकेच नाही तर हळदीचा कार्यक्रमही पार पडला होता.

भारत गणेशपुरे आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच सोशल मीडियावर त्यांच्या मुलाचाही फोटो शेअर केला आहे.

भारत गणेशपुरे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. आता शेवटचे ते हेलो चार्ली चित्रपटात झळकले होते. 

टॅग्स :भारत गणेशपुरेचला हवा येऊ द्या