Join us

Celina Jaitly: “मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर...” सेलिनाने दिलं मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 15:55 IST

Celina Jaitly: एकेकाळी आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सेलिना जेटली आता बॉलिवूडमधून पुरती गायब झाली आहे. अर्थात सोशल मीडियावर ती प्रचंड ॲक्टिव्ह आहे. सध्या हीच सेलिना चर्चेत आलीये.

एकेकाळी आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सेलिना जेटली ( Celina Jaitly) आता बॉलिवूडमधून पुरती गायब झाली आहे. दीर्घकाळापासून ती रुपेरी पडद्यावर झळकलेली नाही. अर्थात सोशल मीडियावर ती प्रचंड ॲक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या हीच सेलिना चर्चेत आलीये. कारणही खास आहे. एका चाहत्याने तिला थेट लग्नाची मागणी घातलीये. चाहत्याच्या या मागणीवर सेलिनाने असं काही मजेशीर उत्तर दिलं की, वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सेलिना जेटली यांना शुभेच्छा. माझी तब्येत बरी नाही. माझी काळजी घ्यायला कोणी नाही. माझी तब्येत बिघडण्याआधी मला लवकर तुझ्याबरोबर घेऊन जा. लवकरात लवकर लग्न कर. मी घरजावई बनायला तयार आहे. माझा जीव आणि आरोग्य वाचव. उत्तर आणि प्रतिसाद द्या. आदर. कोलकात्यातून विजय मगनलाल व्होरा,”असं सेलिनाला टॅग करत एका चाहत्याने लिहिलं.

चाहत्याच्या या लग्नाच्या प्रस्तावावर सेलिनाने मजेशीर उत्तर दिलं. “मी माझ्या पतीला आणि तीन मुलांना विचारते आणि लगेच परत येते...,”असं ती म्हणाली.सध्या त्याचीच चर्चा आहे.

सेलिनाला लग्नाचा प्रस्ताव देणार्या त्या चाहत्याला कदाचित ठाऊक नसावं की, सेलिनाचं लग्न झालंय. एवढंच नाही तर ती तीन मुलांची आई आहे. सेलिनाने २०११ साली ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेन्ड पीटर हागशी लग्न केलं. लग्नाच्या एक वर्षानंतर ती जुळ्या मुलांची आई बनली. त्यानंतर ५ वर्षानी सेलिनाने पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यातील एका बाळाचा प्री-मॅच्युअर बर्थ झाल्यामुळे निधन झालं होतं. सेलिना चित्रपटांपासून दूर हॅप्पी मॅरेज लाइफ एन्जॉय करत आहे. सेलिनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तिने 'जनशीन', 'नो एंट्री', 'अपना सपना मनी मनी' आणि 'गोलमाल रिटर्न्स'मध्ये काम केलं आहे.

टॅग्स :सेलिना जेटलीबॉलिवूड