बॉलिवूडचा पॉवरहाऊस अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. आदित्य धरच्या दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात 'बडे साहब' या नावाचा उल्लेख करण्यात आला होता, तेव्हापासूनच प्रेक्षक या पात्राबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आता 'धुरंधर २' मध्ये ही महत्त्वाची भूमिका नेमकी कोण साकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी नुकतंच यासंबंधी एक ट्वीट केलं आहे.
अनिल कपूरने नुकताच खुलासा केला की त्याने या चित्रपटातील एक महत्त्वाची कॅमिओ भूमिका नाकारली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अशा चर्चा सुरू झाल्या की, अनिल कपूरच 'बडे साहब'च्या भूमिकेत दिसणार होता का? या सर्व तर्कवितर्कांमुळे चाहत्यांची धाकधूक वाढली असतानाच, प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. मुकेश यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर लिहिले की, "बडे भाई साहब कोण आहेत? या कोड्याचे उत्तर शोधण्याचा प्रवास अजूनही सुरू आहे. मित्रांनो, फक्त काही दिवस थांबा – तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."
चित्रपटाच्या कथानकानुसार, 'बडे साहब' हे आयएसआय (ISI) प्रमुख मेजर इक्बाल यांचे बॉस आहेत. असे म्हटले जाते की, चित्रपटातील 'अर्जुन' हे पात्र खऱ्या आयुष्यातील दहशतवादी इलियास काश्मिरीवर आधारित आहे, ज्याचा २००८ च्या मुंबई हल्ल्यासह अनेक मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये हात होता. त्यामुळेच या मुख्य सूत्रधाराची म्हणजेच 'बडे साहब'ची भूमिका कोण साकारणार, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भूमिकेसाठी सुरुवातीला सलमान खान आणि त्यानंतर इमरान हाश्मी यांची नावे चर्चेत आली होती, मात्र या केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे. मुकेश छाबडा यांनी दिलेल्या हिंटमुळे आता प्रेक्षकांना १९ मार्चची प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण त्याच दिवशी 'धुरंधर: द रिव्हेंज' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊन या गुपिताचा उलगडा होणार आहे.
Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar' excites fans. The identity of 'Bade Sahab' remains a mystery. Casting director Mukesh Chhabra hints at a reveal soon. The role, rumored for Salman Khan and Emraan Hashmi, will be unveiled on March 19th.
Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर' को लेकर फैंस उत्साहित हैं। 'बडे साहब' की पहचान रहस्य बनी हुई है। कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबड़ा ने जल्द ही खुलासा करने का संकेत दिया। सलमान खान और इमरान हाशमी के लिए अफवाह वाली भूमिका 19 मार्च को सामने आएगी।