Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कॅप्टन अमेरिका' ख्रिस इव्हान्सने 16 वर्ष लहान गर्लफ्रेंडशी गुपचूप उरकलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 18:58 IST

ख्रिस इव्हान्सने शनिवारी बोस्टमधील त्याच्या घरी अल्बा बाप्टिस्टा या लुसो-ब्राझिलियन अभिनेत्रीसोबत लग्न केलं.

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचे चाहते जगभरात आहेत. यातील सुपरहिरोजची क्रेझ लहानांपासून मोठ्यांमध्ये पाहायला मिळते. यातील सुप्रसिद्ध ‘कॅप्टन अमेरिका’ हे पात्र साकारणारा अभिनेता ख्रिस इव्हान्स हा तर तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा सुपरहिरो आहे. जगभरात लाखो मुली त्याच्या चाहत्या आहेत. ख्रिसने शनिवारी बोस्टमधील त्याच्या घरी अल्बा बाप्टिस्टा या लुसो-ब्राझिलियन अभिनेत्रीसोबत लग्न केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, अल्बा बाप्टिस्टा ही ख्रिसपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. ख्रिस हा 42 वर्षांचा आहे तर अल्बा फक्त 26 वर्षांची आहे. या लग्नसोहळ्याला फक्त जवळच्या लोकांनी हजेरी लावली होती. समोर आलेल्या काही फोटोमध्ये ख्रिससोबत आर्यन मॅन फेम अभिनेता रॉबर्ट डाउनी जूनियर, थॉर फेम ख्रिस हेम्सवर्थ आणि जेरेमी रेनर असे कलाकार सहभागी होते. हे सर्वजण रेस्टॉरंटमध्ये एकत्र जेवण करताना दिसले. आतापर्यंत ख्रिस आणि अल्बाकडून लग्नाबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

अभिनेता ख्रिस इव्हान्स आणि अल्बाने नोव्हेंबर 2022 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दोघांनीही एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. अल्बा बाप्टिस्टाचा ही एक पोर्तुगाल अभिनेत्री आहे. तिने नेटफ्लिक्स सीरीज वॉरियर ननमध्ये काम केलं होतं. 
टॅग्स :हॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी