Join us

'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप?, होतेय उलटसुलट चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 15:00 IST

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चेला उधाण आले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अनिरुद्ध, अरुंधती, संजना, आई, आप्पा, यश, अभिषेक, ईशा, अनघा आणि गौरी या सर्वच पात्र प्रेक्षकांना भावले आहेत. या मालिकेत संजनाची भूमिका रुपाली भोसले हिने साकारली आहे. रुपाली या मालिकेत काम करण्याच्या आधी हिंदी मालिकेत काम केले आहे. तसेच ती बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली आहे. 

रुपाली भोसले हिचे पहिले लग्न झाले आहे. लग्नानंतर त्या वेळेस ती परदेशात राहायला गेली होती. परदेशात राहिल्यामुळे तिला अतिशय वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. पहिल्या दिवसापासून तिच्या नवऱ्याने तिचा छळ सुरू केला होता. त्यामुळे ती कशीबशी भारतात पळून आली. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आणि आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला. 

रुपाली भोसले बिझनेसमन अंकित मगरेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. तसेच बऱ्याचदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. मात्र, आता नुकतीच एक पोस्ट रुपाली भोसले हिने शेअर केली. या पोस्टमध्ये तिने निराशावादी विचार शेअर केले आहेत. त्यामुळे तिचे अंकित मगरे सोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा होताना दिसते आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रूपाली हिने आपल्या सोशल मीडियावर अंकित मगरेसोबत एकही फोटो शेअर केलेला पहायला मिळाला नाही. त्यामुळे या दोघांचे ब्रेकअप झाले असे देखील सांगण्यात येत आहे. अद्याप या वृत्ताला रुपालीकडून दुजोरा मिळालेला नाही. 

टॅग्स :रुपाली भोसलेआई कुठे काय करते मालिकाबिग बॉस मराठी