Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूडचा हा अभिनेता दारूचं व्यसन सोडवण्यासाठी १८ महिने राहिला रिहॅब सेंटरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 13:40 IST

दारूच्या व्यसनामुळे हॉलिवूडच्या या अभिनेत्याची पत्नी झाली विभक्त

अँजेलिना जॉली व ब्रॅड पिटने सप्टेंबर २०१६ मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. ते दोघं सहा मुलांचे आई वडील आहे. अभिनेता ब्रॅड पिटने न्यूयॉर्क टाईम्सला सांगितलं की, अँजेलिना जॉलीने घटस्फोटाची नोटीस बजावल्यानंतर त्याने दारूचे व्यसन सोडविण्यासाठी १८ महिने रिहॅब सेंटरमध्ये राहिला होता. तो म्हणाला की, मी दारू पिणं सोडून दिलं आहे.

ब्रॅड पिटपासून विभक्त झाल्यानंतर अँजेलिना जॉलीने एका मुलाखतीत वेगळं होण्याचं कारण सांगितलं होतं. अँजेलिना म्हणाली होती की, कोणतंही नातं ब्लॅक अँड व्हाईट असू शकत नव्हती. ब्रॅडच्या तुलनेत माझ्याकडे प्रत्येक गोष्टींसाठी माझी वेगळी विचारधारणा आहे. घटस्फोट घेण्यामागे सर्वात पहिलं कारण होतं की मुलांना कसं मोठं करायचं. ब्रॅडचा संशयी व्यवहार आणि दारू पिण्याचे व्यसन यामुळे आम्ही वेगळे झालो. 

तिने पुढे सांगितलं की, त्याने दारूच्या व्यसनामुळे हॉलिवूडमधील बऱ्याच संधी गमावल्या होत्या. त्याला ईर्षा व्हायची जेव्हा मी त्याला माझं काम प्रमोट करू द्यायचे नाही.

तर दुसरीकडे ब्रॅड पिटने सांगितलं की, माझ्या मुलांच्या शिक्षणाबाबतीत अँजेलिनाला माझे निर्णय घेणं आवडत नव्हते. तिचे हे व्यवहार मला अजिबात आवडत नव्हते. मला मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असायची. अँजेलिनाने ब्रॅडवर आरोप केला होता की, विभक्त झाल्यानंतर ब्रॅड मुलांच्या खर्चासाठी योग्य पैसेही देत नाही.

अँजेलिना जोली व ब्रॅड पिट २००५ सालापासून एकत्र होते. नऊ वर्षाच्या नात्यानंतर २०१४ साली दोघे विवाहबंधनात अडकले होते. 

टॅग्स :ब्रॅड पिटअँजोलिना जॉली