Join us
Daily Top 2Weekly Top 5

Border 2 in 100 cr club: तीनच दिवसांत 'बॉर्डर २' सिनेमाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री, कमाईचा आकडा वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 08:54 IST

प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 'बॉर्डर २' चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार सनी देओलचा 'बॉर्डर २' बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाचा रेकॉर्डही मागे टाकला असून अवघ्या तीन दिवसांत 'बॉर्डर २' सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

'बॉर्डर २' ने रविवारी बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी तब्बल ५५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी ३० कोटी आणि दुसऱ्या दिवशी ३६ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी मोठी झेप घेतली आहे. अशाप्रकारे, पहिल्या तीन दिवसांत 'बॉर्डर २'चे एकूण कलेक्शन १२१.७० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

२०२५ मध्ये रिलीज झालेल्या 'छावा' चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ७५-८० कोटींची कमाई केली होती. मात्र, 'बॉर्डर २' ने त्या आकड्याला खूप मागे टाकले आहे. सनी देओलच्या या चित्रपटाने केवळ तीन दिवसांत १२१ कोटींचा आकडा पार करून 'छावा', 'पठाण' किंवा 'गदर २' सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

प्रजासत्ताक दिनी करणार मोठी कमाई?

आज प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात देशभक्तीचे वातावरण आहे, ज्याचा मोठा फायदा या चित्रपटाला मिळणार आहे. दिल्ली, यूपी, बिहार आणि पंजाबमधील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हा चित्रपट 'हाऊसफुल्ल' धावत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अनेक ठिकाणी रात्री उशिराचे शो देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आज 'बॉर्डर २' सिनेमा विक्रमी कमाई करणार अशी दाट शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Border 2' Hits ₹100 Crore in 3 Days: Blockbuster!

Web Summary : Sunny Deol's 'Border 2' storms box office, crosses ₹100 crore in three days. Surpassing 'Chhava', the film collected ₹121.70 crore, breaking records. Republic Day boost expected.
टॅग्स :सनी देओलवरूण धवनसीमारेषादिलजीत दोसांझअहान शेट्टी