Join us

Boney kapoor : अभिनेत्रीसोबत फोटो क्लिक करणं बोनी कपूर यांना पडलं महाग, झाले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 16:39 IST

IIFA Awards 2022, Boney kapoor : होय, बोनी कपूर यांनी ओटीटी अभिनेत्री व होस्ट आरती खेत्रपाल हिच्यासोबत एक फोटो क्लिक केला. हा फोटो व्हायरल झाला आणि बोनी कपूर कधी नव्हे इतके ट्रोल झालेत.

अबुधाबी येथे आयफा अवार्ड सोहळा ( IIFA Awards 2022) मोठ्या थाटामाटात पार पडला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडचे दिग्गज निर्माते बोनी कपूर हेही या सोहळ्याला पोहोचले. सध्या त्यांचीच चर्चा आहे. होय, बोनी कपूर (Boney kapoor) यांनी ओटीटी अभिनेत्री व होस्ट आरती खेत्रपाल हिच्यासोबत एक फोटो क्लिक केला. हा फोटो व्हायरल झाला आणि बोनी कपूर कधी नव्हे इतके ट्रोल झालेत.

या फोटोमध्ये बोनी कपूर यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान केला आहे. तर आरतीने थाय वन पीस ड्रेस परिधान केला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आणि  बोनी कपूर सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत.  चाचा कपूर, तुमच्या मुलीच्या वयाची आहे, अशा शब्दांत एका युजरने बोनी कपूर यांना ट्रोल केलं. काहींनी म्हातारा म्हणत त्यांची खिल्ली उडवली.काहींनी यावरून फोटोतील अभिनेत्री आरतीलाही ट्रोल केलं. या लोकांचे ड्रेस कळतंच नाही, असं एकाने लिहिलं.

बोनी कपूर चार मुलांचे पिता आहेत. त्यांना एकूण 4 मुलं आहेत. जान्हवी कपूर, अंशुला कपूर, खुशी कपूर व अर्जुन कपूर. ते नेहमीच आपल्या मुलांसोबत दिसतात. ते दोनदा विवाह बंधनात अडकले. त्यांचं पहिलं लग्न मोना शौरीसोबत झालं तर दुसरं लग्न श्रीदेवी यांच्यासोबत झालं होतं. अर्जुन व अंशुला हे मोना व बोनी यांची मुलं आहेत. मोना यांना घटस्फोट दिल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत दुसरं लग्न केलं. बोनी व श्रीदेवी यांना जान्हवी व खुशी अशी दोन मुली झाल्या. 2018 साली श्रीदेवी यांचं अकाली निधन झालं.  

टॅग्स :बोनी कपूरआयफा अॅवॉर्डबॉलिवूड