Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री झीनत अमानवरील बायोपीकची घोषणा! ही अभिनेत्री साकारणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 14:07 IST

गेली अनेक दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री झीनत अमान यांच्या बायोपीकची घोषणा करण्यात आलीय

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान सध्या त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. सध्या झीनत अमान यांच्यावर बायोपीक बनणार असल्याची मोठी बातमी समोर येतेय.  'शक: द डाउट' असं या सिनेमाचं नाव आहे. हा बायोपीक प्रेक्षकांना झीनतच्या आयुष्यातील माहित नसलेल्या पैलूंची ओळख करून देईल, यात शंका नाही.

झीनत अमान यांनी गेली अनेक दशकं बॉलीवूडवर राज्य केलं. रोखठोक आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. अलीकडेच त्यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री पायल घोष झीनत यांची भूमिका साकारणार आहे. माध्यमांशी संवाद साधताना पायल म्हणाली, "माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की मला झीनत अमानची भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे."

झीनत अमान यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'हरे रामा हरे कृष्णा', 'यादों की बारात' आणि 'दोस्ताना' या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षक त्यांच्या लक्षात आहेत. अलीकडेच दिग्दर्शक राजीव चौधरी यांनी झीनत अमानच्या जीवनावर बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव चौधरी यांनी  'शक: द डाउट' असं या चित्रपटाचं नाव ठेवलं आहे. आधी या बायोपीकमध्ये प्रियंका चोप्रा भूमिका साकारणार अशी चर्चा होती.

टॅग्स :झीनत अमानआत्मचरित्र