सिंगर झुबीन गर्गच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र आता सिंगरच्या मृत्यूबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये झुबीन गर्ग याचा स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर सिंगापूरमधील एका बेटावर पोहताना बुडून मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
आसामचा रहिवासी असलेल्या झुबीनचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. द स्ट्रेट्स टाईम्समधील रिपोर्टनुसार, सिंगापूर पोलीस दलाने (एसपीएफ) सांगितलं की झुबीनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि प्राथमिक तपासाचे निकाल भारतीय उच्चायुक्तालयाला सादर करण्यात आले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्ट गायकाचा बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. एसपीएफने यापूर्वी स्पष्ट केलं होतं की, झुबीनच्या मृत्यूमध्ये कट किंवा घातपाताची शक्यता नाही.
१९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमधील सेंट जॉन्स बेटाजवळ झुबीन गर्गला बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं होतं की झुबीन एका यॉटवर काही लोकांसोबत होता. २० सप्टेंबर रोजी झुबीनने लाईफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता.
"७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की, पाण्यात उडी मारल्यानंतर काही मिनिटांनी सिंगरने त्याचं लाईफ जॅकेट काढलं आणि नंतर पुन्हा पाण्यात उडी मारली. सिंगापूर पोलिसांनी लोकांना या घटनेशी संबंधित व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करू नयेत असे आवाहन केलं आहे. सिंगापूरच्या रुग्णालयाने जारी केलेल्या झुबीनच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये मृत्यूचं कारण पाण्यात बुडणे हेच असल्याचं नमूद केलं आहे.
झुबीन गर्गचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानु महंता यांना दिल्लीत अटक करण्यात आली. त्यांना गुवाहाटी येथे नेण्यात आलं, सिंगरची पत्नी गरिमा गर्ग म्हणाल्या की, त्यांचा तपास पथकावर पूर्ण विश्वास आहे. झुबीनच्या मृत्यूचं कारण आणि सिंगापूरमध्ये त्याच्यासोबत काय घडले याची संपूर्ण माहिती त्यांना जाणून घ्यायची आहे. झुबीनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने १० सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं आहे.
Web Summary : Singer Zubeen Garg's death in Singapore was due to drowning, not scuba diving, while swimming near St. John's Island. Police investigations rule out foul play. His manager has been arrested due to suspicion.
Web Summary : सिंगापुर में गायक ज़ुबीन गर्ग की मौत स्कूबा डाइविंग से नहीं, बल्कि सेंट जॉन्स द्वीप के पास तैरते समय डूबने से हुई। पुलिस जांच में किसी साजिश की आशंका नहीं है। उनके मैनेजर को संदेह के आधार पर गिरफ्तार किया गया है।