Join us
Daily Top 2Weekly Top 5

कसा दिसतो आणि काय करतो झीनत अमान यांचा मुलगा? बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 12:16 IST

Zeenat Aman Son : 1985 झीनत अमान यांनी मजहर खानसोबत लग्न केलं होतं. या लग्नातून त्यांना जहान आणि अजान खान नावाची दोन मुले झालीत. 

Zeenat Aman Son : झीनत अमान यांचं नाव जरी निघालं तरी त्यांचा चेहरा, त्यांची अदाकारी डोळ्यांसमोर येते. अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या खास अदाकारीने लोकांचं मनोरंजन केलं. झीनत अमान यांनी त्यांच्या काळात सगळ्यात मोठ्या कलाकारांसोबत जसे की, देव आनंद, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र यांच्यासोबत कामे केली. 1985 झीनत अमान यांनी मजहर खानसोबत लग्न केलं होतं. या लग्नातून त्यांना जहान आणि अजान खान नावाची दोन मुले झालीत. 

झीनत यांचा मुलगा जहान खान एक म्युझिक कंपोजर आणि अभिनेता आहे. एक संगीतकार म्हणून जहानने सिनेमाला संगीत दिलं. कपिल शर्माचा सिनेमा 'डून्नो वाय: लव इज लव' मध्ये जहानने म्युझिक दिलं होतं. 

जहानचे काही फोटो सद्या व्हायरल होत आहेत. तो यात व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. त्याने एकापाठी एक अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो आहेत जुने पण पुन्हा व्हायरल झाले आहेत.

जहान खानचं त्याची आई झीनत अमान यांच्यावर खूप प्रेम आहे. तो त्यांचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांआधीच जहानने इन्स्टावर आई झीनत यांचा एक फोटो शेअर केला होता. 

टॅग्स :झीनत अमानबॉलिवूड