Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी सिने पुरस्कार 2019 मध्ये या चित्रपट आणि कलाकारांना मिळाले नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 21:00 IST

‘सर्वोत्कृष्ट चित्रपटां’च्या गटांमध्ये केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेलेच नव्हे, तर समीक्षकांची पसंती लाभलेले चित्रपटही समाविष्ट आहेत.

ठळक मुद्देसंजू, पद्मावत, सिंम्बा, स्त्री, बधाई हो आणि सोनू के टिटू की स्वीटी या चित्रपटांना नामांकन लाभले आहे.

आजवर टीव्हीच्या पडद्यावर कधी बघितला नसेल, असा जल्लोषपूर्ण जलसा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे! ‘झी सिने पुरस्कारा’साठी चित्रपट क्षेत्रातील अप्रतिम कामगिरी आणि चित्रपटीय भूमिकांमध्ये अपूर्व कामगिरी आणि मनोरंजन यांचे मिश्रण यांचा विचार केला जातो. सामान्य व्यक्तीचा असामान्य कलाकाराच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाचा वेध यात घेतला जातो. या पुरस्कारांच्या भव्य सोहळ्याचे यजमानपद यंदा मुंबई भूषविणार असून त्यात केवळ बॉलीवूडमधील दर्जेदार कलाकारच नव्हे, तर जागतिक स्तरावरील नामवंत व्यक्ती, जागतिक मीडिया आणि या चंदेरी दुनियेतील ग्लॅमर लाभलेले तारे हेही सहभागी होणार आहेत. ‘झी सिनेमा’ वाहिनीवर लवकरच प्रसारित होणाऱ्या सोहळ्यामुळे बॉलीवूडच्या जगभरातील चाहत्यांना ‘झी सिने पुरस्कार’ ही सर्वात मोठी मनोरंजन रजनी पाहायला मिळणार आहे.  हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व गटांतील चित्रपटांमधील अप्रतिम अभिनयगुणांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार असून ‘झी सिने पुरस्कारां’द्वारे सर्वात विश्वसनीय पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. तसेच प्रेक्षकांना ज्या कलाकारांना पुरस्कार मिळावा, असे वाटते, त्यांना मतदान प्रक्रियेद्वारे आपले मत देण्याचीही सुविधा आहे. ‘झी सिने पुरस्कार 2019’ गटांमध्ये प्रथमच सोशल मीडियाचा विचार करून प्रेक्षकांच्या पसंतीचीही दखल पुरस्कार निवडीसाठी घेतली जाणार आहे. यातील ऑनलाइन मतदान प्रक्रियेद्वारे ब्रिटन, मध्य-पूर्व, एपॅक वगैरे देशांतील प्रेक्षकांना या पुरस्कार निवडीत सहभागी होता येईल. हे प्रेक्षक आपली मते ZEE5 App या अ‍ॅपद्वारे किंवा झी सिने पुरस्कारांच्या सोशल मीडिया व्यासपीठावरून (FB/ zeecineawardsofficial | Twitter - @zeecineawards | Instagram – @zeecineawards) किंवा www.zeecineawards.com या संकेतस्थळावर अथवा 1800 120 1901 या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तसेच झी सिनेमाच्या कोणत्याही सोशल मीडिया व्यासपीठावरून देऊ शकतात.2018 हे वर्ष हिंदी चित्रपटांसाठी फारच चांगले ठरले असून त्याचेच प्रतिबिंब झी सिने पुरस्कार 2019 च्या प्रेक्षकांच्या नामांकनाच्या यादीत पडलेले दिसेल. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि या वर्षीचे सर्वोत्कृष्ट गाणे या चार प्रमुख गटांमधील हे पुरस्कार अतिशय चुरशीचे ठरले आहेत. ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटां’च्या गटांमध्ये केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेलेच नव्हे, तर समीक्षकांची पसंती लाभलेले चित्रपटही समाविष्ट आहेत. या गटात संजू, पद्मावत, सिंम्बा, स्त्री, बधाई हो आणि सोनू के टिटू की स्वीटी या चित्रपटांना नामांकन लाभले आहे.

‘सर्वोत्कृष्ट अभिनेता/अभिनेत्री’ या गटात यंदा आपल्या दर्जेदार अभिनयगुणांचे प्रदर्शन केलेल्या कलाकारांचा समावेश आहे. या गटात पद्मावत आणि सिंम्बा चित्रपटांतील भूमिकेसाठी रणवीर सिंहला, संजूतील अप्रतिम अभिनयासाठी रणबीर कपूरला, अंधाधुंदमधील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखेसाठी आयुष्यमान खुराणाला, सोनू के टिटू की स्वीटीतील मजेदार अभिनयसाठी कार्तिक आर्यनला आणि सुई धागा- मेड इन इंडियातील सहजसुंदर अभिनयासाठी वरूण धवनला नामांकन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या गटात राझी चित्रपटातील तरल अभिनयासाठी आलिया भटला, सुई धागा- मेड इन इंडियातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी अनुष्का शर्माला, पद्मावतमधील मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनयासाठी दीपिका पादुकोणला, मुल्कमधील अभिनयासाठी तापसी पन्नूला तसेच वीरे दी वेडिंगमधील आगळ्या भूमिकांसाठी करीना कपूर-खान आणि सोनम कपूर-आहुजा या अभिनेत्रींना नामांकन मिळाले आहे.

‘या वर्षीचे सर्वोत्कृष्ट गाणे’ या गटात सोनू के टिटू की स्वीटीमधील बॉम्ब डिगी डिगी, सिंम्बातील आँख मारे, धडकमधील झिंगाट, सत्यमेव जयतेतील दिलबर, वीरे दी वेडिंगमधील तरीफाँ आणि लव्ह यात्रीतील चोगडा या गाण्यांचा समावेश आहे. 

यंदा या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना प्रवेश खुला ठेवण्यात आला असून त्यामुळे त्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना व्यासपीठावर थेट नाच-गाणे करताना पाहता येईल! हा भव्य, दिमाखदार सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी Insider.in येथे नावाची नोंदणी करा आणि आपली जागा राखीव ठेवा.

टॅग्स :पद्मावतसिम्बादीपिका पादुकोणआलिया भटअनुष्का शर्मारणवीर सिंग