Join us

पैठणी साडी, नाकात नथ... शिल्पा शेट्टीचा मराठमोळा साज शृंगार पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:58 IST

शिल्पा शेट्टीचा अस्सल मराठमोळा लूक; 'Video' पाहून तुम्हालाही वाटेल नवल

मराठी मनोरंजन विश्वातील चित्रपट विभागात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी 'झी चित्र गौरव' पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येतो. या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातील विविध मान्यवर खास उपस्थिती लावतात.  यंदाच्या वर्षी या सोहळ्याला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने खास हजेरी लावली. यावेळी शिप्ला मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळाली. ऐवढचं नाही तर तिनं पापराझींशी मराठीत संवाद साधला. 

'झी चित्र गौरव' सोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात शिल्पाच्या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधलं. शिल्पा पिस्ता रंगाची पैठणी साडी नेसून सोहळ्यात पोहचली. यासोबत गळ्यातील हार आणि नाकात नथ अशा मराठमोळा लूकने तिच्या सौंदर्यात भर टाकली. या लूकमध्ये शिल्पा अतिशय गोड दिसत असल्याचं पाहायला मिळालं असून तिचा हा लूक चाहत्यांच्या पंसतीस उतरला आहे.  तिने अगदी कमी मेकअप केला होता. आपल्या एथनिक लूकने तिने चाहत्यांचं मन जिंकलं.

 शिल्पा शेट्टी कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. ९०च्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी शिल्पा शेट्टी आजही तितकीच लोकप्रिय आहे.  शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. शिल्पा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. शिल्पा सोशल मीडियावरुन नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही शेअर करताना दिसते. काही दिवसांपुर्वीच तिने 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीसेलिब्रिटीबॉलिवूडझी मराठी