Join us

आदित्य पांचोलीनं लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला ? झरीना वहाबनं सांगितलं ३६ वर्षांपूर्वीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 09:28 IST

आदित्यची पत्नी जरीना वहाब हिने एका मुलाखतीमध्ये त्याच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) हा चित्रपटांपेक्षा नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. केवळ चित्रपटच नाही, तर टीव्ही जगतातलाही तो एक प्रसिद्ध चेहरा आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये व्हिलन साकारून 'बॅडबॉय' अशी प्रतिमा निर्माण करणारा आदित्य पांचोली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतंच आदित्यची पत्नी जरीना वहाब हिने एका मुलाखतीमध्ये त्याच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

नुकतंच जरीना हिने 'लेहरेन रेट्रो'ला मुलाखत दिली. यावेळी तिने आदित्यचं भरभरुन कौतुक केलं. तो एक उत्तम नवरा असल्याचं ती म्हणाली.  जरीना सांगितलं की, "आमचा निकाह झाल्यावर त्याने धर्मांतर केलं नाही. मुस्लीम प्रथेनुसार त्याला त्याचं नाव बदलावं लागलं. त्याप्रमाणे त्याने नावात बदल केला". पुढे ती म्हणाली, "जेव्हा आमचं लग्न झालं. तेव्हा हे लग्न पाच महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही, असे म्हणत होते. पण आता त्याला 36 वर्षे झाली आहेत. माझ्या घरात बरीच मंदिर आहे. मी नमाज अदा करतो. आमच्या घरात धर्माच्या आधारावर भेदभाव नाही".

आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांची 1986 मध्ये कलंक का टीका या सिनेमाच्या सेटवर ओळख झाली होती. पहिल्याच नजरेत दोघे प्रेमात पडले आणि 20 दिवसानंतर दोघांनी लग्नही केलं होतं. आता त्यांच्या लग्नाला 36 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत.  6 वर्ष मोठ्या असणाऱ्या जरीनाच्या प्रेमात आदित्य पडला होता. दरम्यान,  या जोडीला दोन मुले आहेत. त्यांची नावे सूरज पांचोली आणि सना पांचोली आहेत

टॅग्स :आदित्य पांचोलीबॉलिवूड