Join us
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत दिसणारी चिमुकली आज बनलीय अभिनेत्री तर हा चिमुकला आहे प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 18:27 IST

नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांच्या लग्नातला हा फोटो असून या फोटोत नीतू खूपच छान दिसत आहे.

ठळक मुद्देया फोटोत अभिनेत्री रेखा, तसेच चिमुकली करिश्मा कपूर देखील आहेत. एवढेच नव्हे तर या फोटोत गोल्डी बेहलदेखील आहे. केवळ गोल्डीने फोटो काढत असताना त्याचे तोंड फिरवले आहे. गोल्डी हा आज एक प्रसिद्ध निर्माता असून अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा तो पती आहे. 

नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांना बॉलिवूडमधील क्यूट कपल मानले जाते. ऋषी कपूर सध्या अमेरिकेत उपचार घेत असून त्यांची पत्नी नीतू सतत त्यांच्या सोबत आहे. नीतू यांच्या सोशल मीडियावर त्या ऋषी यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. त्यावरून ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयी त्यांच्या चाहत्यांना माहिती मिळते.

नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांचे लग्न 1980 मध्ये झाले. त्या काळातील ते सगळ्यात चर्चेत असलेले लग्न होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या लग्नाला त्या काळातील बॉलिवूडमधील सगळ्याच आघाडीच्या कलाकारांनी, निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी हजेरी लावली होती. या लग्नाचे अनेक फोटो आपल्याला सोशल मीडियावर देखील पाहायला मिळतात. नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांच्या लग्नातील एक फोटो नुकताच निर्माती सृष्टी बेहल आर्याने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, या फोटोत माझी आई खूपच छान दिसत आहे.

हा फोटो आपण काळजीपूर्वक पाहिला तर आपल्या लक्षात येईल की या फोटोत अभिनेत्री रेखा, तसेच चिमुकली करिश्मा कपूर देखील आहेत. एवढेच नव्हे तर या फोटोत गोल्डी बेहलदेखील आहे. केवळ गोल्डीने फोटो काढत असताना त्याचे तोंड फिरवले आहे. गोल्डी हा आज एक प्रसिद्ध निर्माता असून अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा तो पती आहे. 

या फोटोत नीतू सिंग खूपच सुंदर दिसत असून तिची पुतणी करिश्मा कपूर खूपच गोड दिसत आहे. करिश्माचा संपूर्ण चेहरा या फोटोत दिसत नसला तरी तिच्या झलकवरूनच तिला ओळखता येत आहे. 

नितू सिंग आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असून त्यांना रिद्धीमा आणि रणबीर कपूर अशी दोन मुले आहेत. रणबीरने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली असून त्याने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये रणबीरची गणना केली जाते. 

टॅग्स :करिश्मा कपूरनितू सिंगसोनाली बेंद्रेरेखा