Yo Yo Honey Singh Pune Live Concert: पंजाबी गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगचा एक मोठा चाहतावर्ग आज देशभरात आहे. आपली गाण्याच्या हटके स्टाइल आणि स्वॅगमुळे हनी सिंगनं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हनी सिंग हा त्याच्या गाण्यांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतो. सगळीकडे यो यो हनी सिंगची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अलिकडेच त्याने पुण्यात कॉन्सर्ट घेतला. त्यामुळे पुणेकरांमध्ये 'हनी सिंग'चा फिव्हर पाहायला मिळला आहे. त्यानंतर आता या कॉन्सर्टमधील वेगवेगळे व्हिडीओ, फोटो समोर येत आहे.
नुकताच हनी सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडीओ सानिका वेंगुर्लेकरच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये हनी सिंगने पुणेकरांसोबत मराठीत संवाद साधल्याचा पाहायला मिळतंय. व्हिडीओमध्ये हनी सिंग म्हणतो, "कसा आहेस?….ये फोटो काढणारे…तुझ्या आईला मी सांगतो". हनी सिंगच्या या मराठीतील संवादाने प्रेक्षकांचं मन जिंकलं.एवढंच नाही तर त्याने दादा कोंडकेंचं लोकप्रिय गाणं "ढगाला लागली कळ" या गाण्यांच्या दोन ओळीही गायल्या. हनी सिंगने मराठी गाणं गाताच त्याचे मराठी चाहते खूश झालेत.
हनी सिंग म्हणाला, "मला प्रत्येक भाषा माहितेय. माझं भारतवर प्रेम आहे. म्हणून मी एवढं प्रेम घेऊन आलो आहे" असं म्हणत त्याने आपल्या शर्टवरील हार्ट दाखवले. हनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. दरम्यान अलिकडेच हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंटरी 'यो यो हनी सिंग फेमस' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. . हनी सिंगच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर भाष्य करणारी ही डॉक्युमेंटरी आहे.