Join us

Year Ender 2024: सरत्या वर्षातले 'TOP' सिनेमे तुम्ही पाहिलेत का? लगेच चेक करा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:03 IST

चला तर, एक नजर टाकूया 2024 वर्षातील लोकप्रिय चित्रपटांवर.

भारतीय सिनेसृष्टीसाठी 2024 हे वर्ष खूपच रोमांचक होतं. या वर्षात अनेक चांगले सिनेमे (Movies) प्रदर्शित झाले. काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले. पण, ओटीटीवर येताच त्यांनी धुमाकूळ घातला.  तर असेही काही सिनेमे आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला, शिवाय ओटीटीही गाजवलं. चला तर, एक नजर टाकूया 2024 वर्षातील लोकप्रिय चित्रपटांवर.

सध्या  सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चा भारतासह जगभरात डंका आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल ते चित्रपटगृहात जाऊन पाहू शकतात. 'पुष्पा 2' (Pushpa 2: The Rule) नंतर सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' (Devara: Part 1), कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3'  (Bhool Bhulaiyaa 3) आणि अजय देवगनचा 'सिंघम अगेन'  (Singham Again) हे या वर्षांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत. 

 'सिंघम अगेन' हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार होते. हा चित्रपट आता Amazon Prime वर rent वर उपलब्ध आहे. लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फायटर' हादेखील आहे. 'फायटर' हा चित्रपट जानेवारीत रिलीज झाला होता. या चित्रपटाने जगभरात 344.46 कोटींचा व्यवसाय केला. सध्या हा चित्रपट आता Netflix वर उपलब्ध आहे. 

जर तुम्हाला हॉरर कॉमेडीची आवड असेल तर 'स्त्री 2' चित्रपट नक्की पहा. 'स्त्री 2' सिनेमानं बॉक्स ऑफिस आणि ओटीटी दोन्ही गाजवलं आहे. 'स्त्री 2' Amazon Prime वर पाहू शकता. याशिवाय, सुपरस्टार प्रभासच्या Kalki 2898 AD सिनेमानं बॉक्स ऑफिस गाजवलं. हा सिनेमा Netflix वर उपलब्ध आहे. तर विजय सेतुपती याचा मन आणि डोकं सून्न करणारा थरारक अनुभव देणारा 'महाराजा' सिनेमाही तुम्ही पाहू शकता. हा सिनेमादेखील Netflix वर उपलब्ध आहे.

याशिवाय, शाहिद कपूर आणि क्रिती सनॉनचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट आहे. हा रोबोट आणि मानवावर आधारित चित्रपट आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. शिवाय, या वर्षातील सर्वांत जास्त प्रेक्षकांचं  प्रेम मिळालेला सिनेमा आहे 'लापता लेडीज' (Laapataa Ladies). जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर नेटफ्लिक्सवर पाहू शकता.  

टॅग्स :इयर एंडर 2024अल्लू अर्जुनप्रभासकार्तिक आर्यन