Join us

मनोरंजनाचा डबलडोस; YRF आणि Netflix यांच्यात मल्टीपल प्रोजेक्ट्सचा करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 20:29 IST

यशराज आणि नेटफ्लिक्स यांच्यात मल्टीपल प्रोजेक्ट्सचा करार झालाय. 

सध्या सगळीकडे ओटीटीचा बोलबाला आहे. ओटीटीवर आपल्याला वेगवेगळा कॉन्टेन्ट पाहायला मिळतो. ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचे प्रमुख साधन बनलं आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट काही दिवसांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतात. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन दुप्पट वाढणार आहे. कारण यशराज आणि नेटफ्लिक्स यांच्यात मल्टीपल प्रोजेक्ट्सचा करार झालाय. 

आमिर खानचा मुलगा जुनैद हा यशराज बॅनरखाली तयार होत असलेल्या 'महाराजा' चित्रपटाद्वारे नेटफ्लिक्सवर पदार्पण करणार आहे.  या पार्टनरशिपमध्ये प्रेक्षकांना आणखी एक सीरिज पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे आर माधवनची 'द रेल्वे मॅन'. ही सीरिज चार भागात बनलेली आहे. या मालिकेत आर माधवन व्यतिरिक्त केके मेनन, दिव्येंदू शर्मा आणि बाबिल खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याआधी आदित्य चोप्राची सीरिज 'द रोमँटिक' नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. ज्यामध्ये यश चोप्रा यांच्या प्रवासावर भाष्य करण्यात आलं आहे. 

यशराज फिल्म्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यात लिहिले आहे की, 'नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्सने भारतात प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी एक करार केलाय. आता मनोरंजनाचा नवा अध्याय लवकरच सुरू होणार आहे'. यशराज फिल्म्सचा पाया दिवंगत निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांनी रचला होता. त्यांच्या पश्चात आता त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा सर्व कामकाज पाहत आहे.

नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्समध्ये अनेक वर्षांचा करार झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या उपाध्यक्षा मोनिका शेरगिल म्हणाल्या की, 'यशराज फिल्म्सचे चित्रपट निर्मितीच्या जगात वेगळे स्थान आहे. आता आम्ही प्रेक्षकांपर्यंत अधिक चांगला कटेंट पोहचवू.  तर यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय यांनी म्हटले की, आमचे उद्दिष्ट जगाचे मनोरंजन करणे आहे.  

टॅग्स :बॉलिवूडनेटफ्लिक्सयश चोप्राआदित्य चोप्रा