Join us
Daily Top 2Weekly Top 5

"यामी गौतमने कुराणचा अभ्यास केलाय..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:16 IST

२०२५ ला आलेल्या 'हक' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. यामी गौतमने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती

२०२५ ला आलेल्या 'हक' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. यामी गौतमने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. नोव्हेंबरमध्ये आलेल्या या सिनेमात इमरान हाश्मी आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत होते. यामीच्या भूमिकेचं सर्वांनी खूप कौतुक केलं. अशातच दिग्दर्शक सुपन यांनी एका मुलाखतीत यामी तिच्या भूमिकेसाठी किती गंभीर होती याचा खुलासा केलाय. इतकंच नव्हे याच सिनेमासाठी यामीने कुराणचा अभ्यासही केल्याचंही समोर आलं आहे.

कुराणाचा अभ्यास करणं का गरजेचं होतं? दिग्दर्शक सुपन वर्माने सांगितलं की 'हक'साठी कुराण शिकणं का गरजेचं होतं. ते म्हणतात, ''आम्ही इस्लामी कायदे समजण्यासाठी जवळपास दीड वर्ष घालवली. यासाठी खूप रिसर्च करण्यात आला होता. कारण एका चुकीच्या माहितीने सर्व गोष्टी पुढे चुकीच्या झाल्या असत्या.  सर्वांकडे माहिती आहे परंतु त्यातलं चुकीचं काय आणि बरोबर काय हे कोणालाच माहिती नाही. अशा वातावरणात हक सिनेमा एक समजुतदार आणि जबाबदार आवाज होईल, अशी आमची इच्छा होती.''अशाप्रकारे दिग्दर्शकाने 'हक' विषयी खुलासा केला. एकूणच सिनेमा धार्मिक आणि सामाजिक भावनांवर आधारीत असल्याने कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी पूर्ण जबाबदारीने काम केलं आणि अभ्यास केला. यामी गौतमनेही तिच्या भूमिकेसाठी पडद्यामागे मेहनत केलेली दिसली. 'हक' सिनेमा चांगला असूनही तो बॉक्स ऑफिसवर फक्त ३० ते ४० कोटी रुपयेच कमावू शकला. पण सिनेमा जसा नेटफ्लिक्सवर आला तसं या सिनेमाचं अनेकांनी कौतुक केलं. करण जोहरसारख्या बड्या सेलिब्रिटींनी यामीच्या अभिनयाची प्रशंसा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Yami Gautam Studied Quran for 'Haq': Director Reveals Reason

Web Summary : Director reveals Yami Gautam's dedication to 'Haq,' studying Quran for role. Extensive research ensured accuracy in portraying Islamic law. Despite initial box office performance, film gained recognition on Netflix, praised by celebrities.
टॅग्स :यामी गौतमबॉलिवूडइमरान हाश्मी