Join us

"माझ्याशी लग्न करशील का?" दीपिकाने गुडघ्यावर बसून सलमानला केलेलं प्रपोज, भाईजान म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:14 IST

सलमान आणि दीपिकाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दीपिकाने खुल्लेआम सलमानला प्रपोज केलं. पुढे काय घडलं बघा

सलमान खान हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता. सलमानला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सलमान यशाच्या शिखरावर असला तरी आजही तो सिंगल आहे. सलमानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. परंतु सलमानने कोणासोबतही लग्नगाठ बांधली. अशातच सलमानविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, एकदा दीपिका पादुकोणने सलमानला लग्नाची मागणी घातली होती. त्यावर सलमान काय म्हणाला, जाणून घ्या.

दीपिकाने घातली सलमानला लग्नाची मागणी

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओत दिसतंय की, दीपिका पादुकोण सलमानशी बोलता बोलता तिच्या गुडघ्यांवर बसली. दीपिकाने सलमानला विचारलं, "मला तुमच्याशी लग्न करायचंय. सलमान खान तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?" त्यावेळी सलमान दीपिकाला उत्तर देत म्हणाला की, "दीपिका असू दे किंवा दुसरी कोणी व्यक्ती, हे अजिबात शक्य नाही." अशाप्रकारे सलमानने दीपिकाच्या लग्नाची मागणी धुडकावून लावली. या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स आहेत.

अशाप्रकारे हा व्हिडीओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. दीपिका आणि सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, सलमानचा नुकताच रिलीज झालेला 'सिकंदर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. या सिनेमात सलमानसोबत रश्मिका मंदाना झळकली. पण लोकांनी या सिनेमाला नापसंती दर्शवली. दुसरीकडे दीपिका आपल्याला 'कल्की २८९८ एडी' या सिनेमात शेवटची दिसली. याशिवाय दीपिका सध्या महिलांसाठी ८ तासांची शिफ्ट, या प्रकरणामुळे चर्चेत आली. दीपिका आणि 'अॅनिमल'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यामध्ये या प्रकरणामुळे मतभेद निर्माण झाले. सध्या दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती उपलब्ध नाही.

टॅग्स :सलमान खानदीपिका पादुकोणबॉलिवूड