लोकप्रिय सेलिब्रिटी कपल असलेल्या कतरिना कैफ आणि विकी कौशलने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. कतरिना आणि विकी लवकरच आईबाबा होणार आहे. लग्नाच्या तीन वर्षांनी कतरिना गरोदर असून ती ४२व्या वर्षी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. कतरिना-विकीला मुलगा होणार की मुलगी? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. एका सेलिब्रिटी ज्योतिषाने याचं गुपित उलगडलं आहे.
सेलिब्रिटी ज्योतिष अनिरुद्ध कुमार मिश्रा यांनी विकी-कतरिनाला मुलगा होणार की मुलगी? याबाबत भाकित केलं आहे. त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. कतरिना आणि विकीचा लग्नातील फोटो त्यांनी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कतरिना आणि विकीला मुलगी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचं पहिलं अपत्य हे मुलगी असेल", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ज्योतिष अनिरुद्ध मिश्रा यांनी याआधीही अनेक सेलिब्रिटींबाबत भाकित केले होते. विशेष म्हणजे अनुष्का शर्मा आणि करीना कपूर यांच्याबद्दल ज्योतिषाने केलेलं भाकित खरं ठरलं होतं. २०२० मध्ये अनुष्का शर्मा आणि करीना यांच्या प्रेग्नंसीबाबत त्यांनी भाकित केलं होतं. २०२१ मध्ये अनुष्काला मुलगी होईल आणि करीनाला दुसराही मुलगाच होईल, असं ते म्हणाले होते.
Web Summary : Katrina Kaif and Vicky Kaushal are expecting! A celebrity astrologer predicts they will have a daughter. Previously, this astrologer accurately predicted the genders of Anushka Sharma and Kareena Kapoor's babies.
Web Summary : कैटरीना कैफ और विक्की कौशल जल्द ही माता-पिता बनने वाले हैं! एक सेलिब्रिटी ज्योतिषी ने भविष्यवाणी की है कि उन्हें एक बेटी होगी। इससे पहले, इस ज्योतिषी ने अनुष्का शर्मा और करीना कपूर के बच्चों के लिंग की सटीक भविष्यवाणी की थी।