Join us

 काय ‘पंगा’च्या रिलीजनंतर कंगना राणौत चढणार बोहल्यावर? म्हणून होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:48 IST

होय, कंगना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे.

ठळक मुद्देकंगनाचा ‘पंगा’ हा सिनेमा लवकरच  रिलीज होणार आहे.  

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते कायम उत्सुक असतात. मग सेलिब्रिटींच्या लग्नाची गोष्ट असेल तर चाहते नको इतके उतावीळ होतात. या नव्या वर्षात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. कंगना राणौतही यापैकी एक असू शकते. होय, कंगना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे.अध्ययन सुमन आणि हृतिक रोशनसोबत कंगनाचे ब्रेकअप झाले हा आता भूतकाळ झाला. वर्तमानाबद्दल सांगायचे झाल्यास आता कंगना सिंगल नाही. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द कंगनाने ती सिंगल नसल्याचे स्पष्ट केले होते.

आता आयुष्यात कुणी आहे म्हटल्यावर कंगनाच्या लग्नाची चर्चा होणारच. कदाचित आता कंगनाही लग्नासाठी तयार आहे. होय,एका ताज्या मुलाखतीत कंगना लग्नाच्या प्लॉनिंगबद्दल बोलली. ‘योग्य जोडीदार निवडणे निश्चितपणे कठीण आहे. पण नितेश तिवारीला (‘पंगा’ या सिनेमाची दिग्दर्शिता अश्विनी अय्यर हिचा पती)  भेटल्यानंतर लग्नाबद्दलचे माझे मत बदलले आहे. तो आपल्या लग्नात प्रचंड आनंदी आहे. पत्नीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे. आता कदाचित मी सुद्धा लग्नासाठी तयार आहे,’ असे कंगना यावेळी म्हणाली.

कधी लग्न करणार? असे विचारले असता ‘लवकरच’, असे कंगना म्हणाली. यावरून ‘पंगा’ हा आगामी सिनेमा रिलीज झाल्यानंतर कंगना लग्नबेडीत अडकणार, असा कयास बांधला जात आहे.

कंगनाचा ‘पंगा’ हा सिनेमा लवकरच  रिलीज होणार आहे.   या सिनेमात कंगना एका लग्न झालेल्या कबड्डी खेळाडूची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 24 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :कंगना राणौत