अखेर सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भारत’चा टीजर लॉन्च झाला. सध्या हा टीजर पाहून भाईजानचे चाहते जाम सुखावले आहेत. सोशल मीडियावर अगदी काही तासात भाईजानच्या या चित्रपटाचा टीजर सुपरहिट झाला आहे. टीजरमधील सलमानच्या पाच वेगवेगळ्या लूक्सचीही प्रचंड चर्चा आहे. अर्थात कॅटरिना कैफचे चाहते मात्र काहीसे हिरमुसलेत. याचे कारण म्हणजे, या टीजरमध्ये कॅटरिना कुठेही नाही. ‘भारत’मध्ये सलमान व कॅटरिना लीड रोलमध्ये आहेत. या जोडीचे असंख्य चाहते आहे. अशात या जोडीची एक झलक टीजरमध्ये दिसेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण कॅटरिना टीजरमध्ये अगदी सेकंदापुरतीही दिसत नाही. असे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला असतांना आता या प्रश्नाचे उत्तरही मिळाले आहे.
‘भारत’च्या टीजरमधून कॅटरिना कैफ का झाली बाद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 09:30 IST
भाईजानच्या ‘भारत’चा टीजर सुपरहिट झाला आहे. टीजरमधील सलमानच्या पाच वेगवेगळ्या लूक्सचीही प्रचंड चर्चा आहे. अर्थात कॅटरिना कैफचे चाहते मात्र काहीसे हिरमुसलेत.
‘भारत’च्या टीजरमधून कॅटरिना कैफ का झाली बाद?
ठळक मुद्दे‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे.