आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्याचे जोरदार कौतुक होत आहे. चित्रपटाचा पहिला लूक टीझर समोर आल्यापासून रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांच्या वयातील २० वर्षांचे अंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. आता चित्रपटाचे कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्राने या दोघांमधील वयाच्या मोठ्या अंतरावर भाष्य केले असून त्याने सारा अर्जुनलारणवीर सिंगच्या विरुद्ध का कास्ट केले, हे सांगितले आहे.
एका मुलाखतीत बोलताना मुकेश छाब्राने रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांच्यातील वयाच्या अंतरावर भाष्य केले. त्याने सांगितले की, वयाच्या अंतराशी संबंधित प्रश्नांची उत्तरे पुढील वर्षी 'धुरंधर २' प्रदर्शित झाल्यावर मिळतील. कथेनुसार ही गोष्ट आवश्यक होती, असेही त्याने सांगितले. ते लोकांना समजावू शकले नाहीत, पण सोशल मीडियावर वयाच्या अंतरावर सुरू असलेल्या चर्चा वाचून त्यांना हसू येत होते.
'धुरंधर २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
तो म्हणाला की, ''नाही, मला खूप स्पष्ट सूचना मिळाली होती. कथा अशी आहे की हम्जा (रणवीर सिंग) तिला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, आम्हाला माहीत होतं की आम्हाला एक अशी मुलगी हवी आहे जी २०-२१ वर्षांची असेल आणि जेव्हा पार्ट २ येईल, तेव्हा जे लोक वयाच्या अंतराबद्दल बोलत आहेत, त्यांना सर्व उत्तरे मिळतील. असं नाही की आमच्याकडे २६-२७ वर्षांचे चांगले कलाकार नाहीत, पण वयाचे अंतर चित्रपटात आवश्यक होते. तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकांना समजावू शकत नाही. जेव्हा मी देखील वयाच्या अंतराबद्दल वाचत होतो, तेव्हा मला हसू येत होतं. चित्रपटाच्या सूचनेनुसार हे योग्य आहे.''
१३०० ऑडिशननंतर साराची निवडमुकेश छाब्राला पुढे विचारण्यात आलं की, त्यांनी या भूमिकेसाठी साराची निवड का केली, कारण आदित्य धरने सांगितले होते की या भूमिकेसाठी १३०० मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. यावर त्याने उत्तर दिले की, ''मला खूप आनंद आहे की आदित्यसह अनेक दिग्दर्शक आता नवीन लोकांना जास्त संधी देत आहेत. तर, माझी कल्पना अशी होती की आम्ही एक संपूर्ण नवीन जग उभारत आहोत. त्यामुळे, आम्ही आश्चर्यचकित करणारी कास्टिंग करत आहोत आणि ही मुलगी अगदी नवीन दिसली पाहिजे. जरी ती बालकलाकार राहिली असेल आणि बालकलाकार म्हणून काही चित्रपट केले असले तरी, आम्हाला एक नवीन दृष्टीकोन द्यायचा होता. तर, मी सारासोबत अनेक वर्षांपासून काम करत आहे, आणि ती ऑडिशनसाठी येत राहिली आहे. ती खरोखर एक खूप चांगली मुलगी आहे. तिने जेव्हा ऑडिशन दिले, तेव्हा तिच्या निरागस चेहऱ्यामागे लपलेला अभिनय मी पाहिला. ती खूपच उत्कृष्ट अभिनेत्री आहे, हे तुम्ही भाग २ मध्ये पाहाल.''
'धुरंधर' सिनेमा
'धुरंधर'मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर. माधवन देखील आहेत. निर्मात्यांनी दुजोरा दिला आहे की, सीक्वेल, धुरंधर २ सिनेमा १९ मार्च, २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
Web Summary : 'Dhurandhar' sparks debate over Ranveer-Sara's age gap. Casting director reveals the reason behind casting Sara, hinting that 'Dhurandhar 2' will explain the casting choice. Sara was chosen after 1300 auditions.
Web Summary : रणवीर-सारा की उम्र के अंतर पर 'धुरंधर' ने छेड़ी बहस। कास्टिंग निर्देशक ने सारा को कास्ट करने का कारण बताया, 'धुरंधर 2' में रहस्य खुलेगा। 1300 ऑडिशन के बाद सारा का चयन हुआ।