९० च्या दशकात अभिनेता गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन या जोडीने बॉलिवूडवर राज्य केले होते. या जोडीने सुमारे १५ हिट चित्रपट दिले असून, 'डेव्हिड-गोविंदा' एकत्र आले की, यशाचे समीकरण मानले जात असे. मात्र, नंतर या दोघांमध्ये प्रचंड दुरावा निर्माण झाला आणि ही जोडी कायमची तुटली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाने डेव्हिड धवन यांच्यासोबत झालेल्या वादावर आणि त्यांच्यातील मतभेदांवर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
काय होते वादाचे मुख्य कारण?
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने सांगितले की, ''डेव्हिड धवन त्यांच्या कामाप्रती नेहमीच प्रामाणिक होते, परंतु त्यांच्या कलाकारांबद्दल ते इतके प्रामाणिक नव्हते. चित्रपटसृष्टीत प्रामाणिकपणाला वेगळे महत्त्व आहे, पण जर तुमची निष्ठा दुसऱ्या कोणाशी तरी असेल, तर तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे राहते. काही लोक डेव्हिड यांना माझ्यासोबत काम करु नका, म्हणून सांगत होते. गोष्टी हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच मी या मैत्रीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.''
गोविंदाने पुढे सांगितले की, ''जेव्हा मी राजकारणात प्रवेश केल्यामुळे अभिनयातून ब्रेक घेतला होता, तेव्हा अभिनयात कमबॅक करताना मी सर्वात आधी डेव्हिड धवन यांना फोन केला होता. त्यानंतर 'पार्टनर' या चित्रपटावर चर्चा झाली आणि मीच या चित्रपटात सलमान खानला घेण्याचा सल्ला दिला होता.'' २००७ मध्ये आलेला 'पार्टनर' हा चित्रपट सुपरहिट ठरला, मात्र त्यानंतर या जोडीने पुन्हा कधीच एकत्र काम केले नाही. अशाप्रकारे गोविंदाने डेव्हिड धवनच्या मैत्रीबद्दल खुलासा केला.
Web Summary : Govinda disclosed that a lack of loyalty from Dhawan towards him led to their fallout, despite initial success. He initiated 'Partner' with Salman after a break. Their partnership dissolved post the film's success due to irreconcilable differences.
Web Summary : गोविंदा ने खुलासा किया कि धवन की वफादारी की कमी के कारण उनका ब्रेकअप हो गया, शुरुआत में सफलता के बावजूद। उन्होंने ब्रेक के बाद सलमान के साथ 'पार्टनर' की शुरुआत की। फिल्म की सफलता के बाद उनका साथ मतभेदों के कारण टूट गया।