हिंदी चित्रपटसृष्टीचे 'डिस्को किंग' म्हणून ओळखले जाणारे दिवंगत संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचा आवाज जसा लोकांना आवडायचा तसंच त्यांचं राहणीमानही लक्ष वेधून घेणारे होते. गळ्यात सोन्याच्या जाड चेन, हातात ब्रेसलेट आणि बोटात अंगठ्या यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. आज त्यांची जयंती. त्यानिमित्त जाणून घ्या हा खास किस्सा
सोनं घालण्यामागचे खास कारण
बप्पी लहरी यांना सोनं परिधान करायला खूप आवडत असे. सोनं त्यांच्यासाठी केवळ फॅशन स्टेटमेंट नव्हते, तर ते सोन्याला आपलं भाग्य मानायचे. ते नेहमीच सोन्याचे दागिने घालून दिसायचे, ज्यामुळे त्यांची 'गोल्ड मॅन' अशीही ओळख झाली होती.
एका जुन्या मुलाखतीत बप्पी लहरी यांनी यामागचे कारण स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते की, '''हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक एल्विस प्रेस्ली (Elvis Presley) यांना सोन्याच्या चेन परिधान करणे आवडत असे. एल्विस माझा आवडता गायक होता. मी तेव्हाच ठरवले होते की जेव्हा मी आयुष्यात यशस्वी होईन, तेव्हा माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेन. आणि त्यानंतरच मी एवढं सोनं घालायला सुरुवात केली. माझ्यासाठी सोनं परिधान करणं खूप लकी आहे," असं त्यांनी सांगितलं होतं.
किती होते सोने?
बप्पी लहरी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोनं आणि ४.६२ किलो चांदी असल्याची माहिती देण्यात आली होती. यावरून त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांचे सोनं होते, हे स्पष्ट होते.
लक्झरी गाड्यांचे शौकीन
सोनं आणि संगीतासोबतच बप्पी लहरी यांना महागड्या आणि लक्झरी गाड्यांचाही खूप शौक होता. त्यांच्या गॅरेजमध्ये उत्तम गाड्यांचा संग्रह होता. त्यांच्याकडे जगातील काही उत्कृष्ट लक्झरी कार्स होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण ५ कार्स होत्या, ज्यात बीएमडब्ल्यू आणि ऑडी सारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश होता. याशिवाय, त्यांच्याकडे टेस्ला एक्स (Tesla X) ही इलेक्ट्रिक कार देखील होती, ज्याची किंमत तेव्हा सुमारे ५५ लाख रुपये होती. बप्पी लहिरींनी आपल्या खास शैलीने आणि अजरामर संगीताने बॉलिवूडमध्ये एक अविस्मरणीय छाप सोडली आहे.
Web Summary : Bappi Lahiri, the 'Disco King,' loved gold, considering it lucky. Inspired by Elvis Presley, he wore it to create a unique identity. He owned 754 grams of gold and luxury cars.
Web Summary : 'डिस्को किंग' बप्पी लहरी को सोना पसंद था, वे इसे भाग्यशाली मानते थे। एल्विस प्रेस्ली से प्रेरित होकर, उन्होंने अपनी अलग पहचान बनाने के लिए इसे पहना। उनके पास 754 ग्राम सोना और लग्जरी कारें थीं।