Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बुलबुल’च्या या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर बोलबाला, जाणून घ्या तृप्ती डिमरीबद्दल सर्व काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 11:01 IST

अनुष्का शर्माची निर्मिती असलेला ‘बुलबुल’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आणि एक चेहरा अचानक चर्चेत आला. तिचे नाव तृप्ती डिमरी. 

ठळक मुद्दे‘बुलबुल’नंतर तृप्तीची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. 

अनुष्का शर्माची निर्मिती असलेला ‘बुलबुल’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आणि एक चेहरा अचानक चर्चेत आला. होय, तिचे नाव तृप्ती डिमरी. चित्रपटात तिने बुलबुलची भूमिका साकारली आहे. तूर्तास तरी सोशल मीडियावर तृप्तीची चर्चा आहे. तिच्या सुंदर चेह-याने सर्वांना भुरळ पाडली आहे. प्रत्येकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे़ तेव्हा जाणून घेऊ यात, तृप्तीबद्दलच्या काही खास गोष्टी...

तृप्तीचा जन्म 23 फेबु्रवारी 1994 रोजी झाला. मॉडेल म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. मॉडेलिंगच्या सुरुवातीला अनेक जाहिरातीमध्ये ती झळकली, संतूर टीव्हीसीमध्ये तुम्ही तिला पाहू शकता.

2017 साली ‘पोस्टर बॉइज’ या कॉमेडी चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने श्रेयस तळपदेची गर्लफ्रेन्ड रियाची भूमिका साकारली होती. या सिनेमात श्रेयस, सनी देओल व बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते.

यानंतर इम्तियाज अलीच्या ‘लैला मजनू’ या सिनेमात ती लीड भूमिकेत झळकली. यात तिने लैलाची क्लासिक भूमिका साकारली होती.

बालपणापासून केवळ अ‍ॅक्टिंग करायचे, एवढेच तिचे स्वप्न होते. पण चित्रपटात अ‍ॅक्टिंग करेल, याची कल्पनाही तिने केली नव्हती. दिल्लीच्या एका एजन्सीशी जुळल्यानंतर तिला ऑडिशनची संधी मिळाली. ‘पोस्टर बॉईज’ मिळाला आणि ती मुंबईतचं राहिली. 

2016 मध्ये ‘लैला मजनू’साठी तिने ऑडिशन दिले. पण ती रिजेक्ट झाली. यानंतर तिची मैत्रिण याच चित्रपटाच्या ऑडिशनसाठी जाणार होती. तृप्ती सहज म्हणून तिच्यासोबत गेली. पण ऑडिशन घेणा-यांनी तृप्तीला ऑडिशनद्यायला सांगितले. तुम्ही आधीच मला रिजेक्ट केले आहे, असे तिने सांगितले. पण पुन्हा एकदा प्रयत्न कर, म्हणून त्यांनी तृप्तीला कॅमे-यासमोर उभे केले आणि ‘लैला मजनू’ तृप्तीला मिळाला.

तृप्ती अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि हृतिक रोशनची खूप मोठी चाहती आहे. दीपिका पादुकोण तिची आवडती अभिनेत्री आहे.

फॅशनिस्टा असलेल्या तृप्तीला वाचनाची आणि भटकंतीची आवड आहे.

‘बुलबुल’नंतर तृप्तीची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. साहजिकच येत्या काळात तिची मोठी डिमांड असेल आणि मोठमोठ्या बॅनरच्या सिनेमांमध्ये ती झळकेल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :अनुष्का शर्माबॉलिवूड