Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे निकिता गांधी? जिच्या कॉन्सर्टमधील चेंगराचेंगरीत चार जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 17:06 IST

सोशल मीडियावर निकिता गांधी ट्रेंड करत आहेत. तर निकिता गांधी कोण आहे हे जाणून घेऊया.

केरळच्या कोच्चि विद्यापीठात  निकिता गांधीच्या कॉन्सर्टदरम्यान मोठी दुर्घटना घडली. चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले.  जीव गमावलेल्या चार विद्यार्थ्यांमध्ये 2 मुले आणि 2 मुली आहेत. निकिता गांधीने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. या अपघातानंतर निकिता गांधी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर निकिता गांधी ट्रेंड करत आहेत. तर निकिता गांधी कोण आहे हे जाणून घेऊया.

निकिता गांधी ही पार्श्वगायिका आहे. तिने कोलकाता येथून सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर 2010 मध्ये चेन्नई येथून दंतचिकित्सेचे शिक्षण घेतले.  1 ऑक्टोबर 1991 रोजी जन्मलेली निकिता ही अर्धी पंजाबी आणि अर्धी बंगाली आहे.  निकिता गांधी  आणि ए.आर. रेहमान यांच्यात खास नाते आहे.  2014 साली एआर रहमानने निकिताला 'मी' चित्रपटात गाण्याची संधी दिली. निकिताने या चित्रपटातील 'लाडिओ' हे गाणे गायले आहे. 

निकिताने आतापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि कन्नड या पाच भाषांमध्ये गाणी गायली आहेत. निकिता हिने ‘सचिन: ए बिलियन ड्रीम्स’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘केदारनाथ’, ‘लुका छुपी’, ‘सूर्यवंशी’ आणि ‘टाइगर 3’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. परदेशातही आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. तिने इराणी चित्रपट 'मुहम्मद (एसएएल): द मेसेंजर ऑफ गॉड' आणि 'पेले: बर्थ ऑफ ए लिजेंड' या हॉलिवूड चित्रपटासाठीही गाणी गायली आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड