Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:03 IST

संजय कपूर यांच्या पार्थिवावर कधी आणि कुठे अंत्यसंस्कार होणार यासंबंधी सासऱ्यांनी माहिती दिली आहे.

बिझनेसमन आणि अभिनेत्री करिष्मा कपूरचे पूर्व पती संजय कपूर (Sunjay Kapur) यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रिया सचदेव ही संजय कपूर यांची पत्नी आहे. संजय कपूर यांच्या पार्थिवावर कधी आणि कुठे अंत्यसंस्कार होणार यासंबंधी प्रियाच्या वडिलांनी माहिती दिली आहे.

संजय कपूर यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. लवकरच त्यांचं पार्थिव भारतात आणलं जाईल. मात्र यासाठी बराच वेळ लागत आहे. त्यामुळे आता कायदेशीर प्रक्रियांमुळे त्यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी वेळ लागत आहे. एनडीटीव्ही रिपोर्टनुसार, त्यांच्या अंत्यसंस्काराला विलंब होऊ शकतो. कारण त्यांच्याकडे अमेरिकी नागरिकत्व होतं आणि लंडनमध्ये त्यांचं निधन झालं. त्यामुळे पार्थिव भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया थोडी किचकट झाली आहे. संजय यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार होतील असं त्यांचे सासरे अशोक सचदेव यांनी कन्फर्म केलं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संजय कपूर यांचं पार्थिव भारतात आणलं जाईल.

संजय कपूर यांचं १२ जून रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना निधन झालं. तोंडात मधमाशी गेल्याने त्यांना हृदयविकाराचा धक्का आला असं रिपोर्ट्समध्ये आलं. त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच धक्का बसला. संजय यांना प्रिया सचदेवपासून एक मुलगा आणि एक सावत्र मुलगी आहे. तर करिष्मापासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. संजय कपूर प्रसिद्ध बिझनेसमन होते ज्यांची १० हजार कोटींची संपत्ती होती.

टॅग्स :सेलिब्रिटीव्यवसायलंडनभारत