बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत आवर्जुन नाव घेतलं जातं ते तब्बूचं (Tabu). आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक गाजलेल्या भूमिका केल्या. त्यामुळे इंडस्ट्रीत तिच्या नावाचा दबदबा आहे. अनेक एकाहून एक सुपरहिट सिनेमा दिलेल्या या अभिनेत्रीला मात्र एकदा चांगलचं अपमानित करण्यात आलं होतं. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्यावर बेतलेला हा प्रसंग सांगितला.
तब्बूने तिच्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य कलाविश्वातून केली. कुली नंबर १ या तेलुगू सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने माशूक, विजयपथ, प्रेम, साजन की बाहों मे अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे साऊथसह बॉलिवूडमध्येही ती लोकप्रिय झाली. मात्र, लोकप्रियतेच्या शिखरावर असतांनाच तिचा अभिनेता आमिर खानच्या एका सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
१९९९ साली आलेल्या 'मन' या चित्रपटात तब्बूला कास्ट करण्यात आलं होतं. पण अचानक तब्बूला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. तिच्याजागी मनीषा कोईरालाची एन्ट्री झाली. २००१ साली फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये तब्बू यावर भाष्य केलं.
"आमिरसोबत काम करायला मिळणार म्हणून मी खूप आनंदी होते. 'मन' चित्रपटासाठी फोटोशूटही झालं होतं. यानंतर काय झालं मला माहित नाही. पण मला सिनेमातून काढून टाकण्यात आलं. माझ्यामते, असा गेम बहुतेक अभिनेत्रींसोबत होतो'', असं ती म्हणाली होती. इतकंच नाही तर मन या सिनेमाशिवाय तिला गोविंदाच्या 'कुंवारा' या सिनेमातूनही ऐनवेळी काढून टाकलं होतं. या सिनेमात तिच्या जागी उर्मिला मातोंडकरची वर्णी लागली होती.
''चीचीसोबत 'कुंवारा' करायला मिळाला असता तर मज्जा आली असती. पण मला खूप खंत वाटते या सगळ्याची. मला खूप अपमान सहन करावा लागला. अर्थात माझ्या मनात कोणाबद्दलही कुठलाही राग नाही, असंही ती यावेळी म्हणाली होती
Web Summary : Tabu was initially cast in Aamir Khan's 'Mann' but was abruptly replaced by Manisha Koirala. She expressed disappointment, revealing a similar experience with Govinda's 'Kunwara,' where she was replaced by Urmila Matondkar, causing her considerable hurt.
Web Summary : तब्बू को शुरू में आमिर खान की 'मन' में लिया गया था, लेकिन अचानक मनीषा कोइराला ने उनकी जगह ले ली। उन्होंने निराशा व्यक्त करते हुए खुलासा किया कि गोविंदा की 'कुंवारा' के साथ भी ऐसा ही अनुभव हुआ, जहाँ उन्हें उर्मिला मातोंडकर ने बदल दिया, जिससे उन्हें काफी दुख हुआ।